दहशतवादी संघटनेत युवकांची भरती घटली

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जुलै 2019

दहशतवादी संघटनेत भरती होण्याचे काश्‍मीर युवकांचे प्रमाण 40 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे आज केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत सांगितले.तसेच घुसखोरीचे प्रमाण देखील 43 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले.

नवी दिल्ली: दहशतवादी संघटनेत भरती होण्याचे काश्‍मीर युवकांचे प्रमाण 40 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे आज केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत सांगितले.तसेच घुसखोरीचे प्रमाण देखील 43 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्यावर्षीच्या तुलनेत चालू वर्षातील पहिल्या सहा महिन्यात काश्‍मीरमधील स्थितीत सुधारणा झाल्याचे रेड्डी म्हणाले. घुसखोरीचे प्रमाण 43 टक्‍क्‍यांनी तर दहशतवादी संघटनेत भरतीचे प्रमाण 40 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. तसेच दहशतवादी कारवायात 28 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. देशविघातक शक्तींना रोखण्यासाठी सुरक्षा दल दक्ष असून राष्ट्रहिताबाबत कोणतिही तडजोड केली जाणार नाही, असे ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth recruitment decreases in terrorist organization