Vidhan Sabha 2019 : हरियानात युवाशक्ती किंगमेकर

पीटीआय
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

यंदा हरियाना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युवाशक्तीच किंगमेकर ठरणार आहे. राज्यामध्ये चाळिशीखालील मतदारांची संख्या ८९ लाख ४२ हजारांपेक्षाही अधिक असल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

चंडीगड- यंदा हरियाना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युवाशक्तीच किंगमेकर ठरणार आहे. राज्यामध्ये चाळिशीखालील मतदारांची संख्या ८९ लाख ४२ हजारांपेक्षाही अधिक असल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यंदा सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराच्या माध्यमातून तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता.

हे दोन जिल्हे मोठे
मतदारांच्या संख्येच्या दृष्टीने फरिदाबाद आणि गुडगाव हे दोन्ही जिल्हे मोठे आहेत. या दोन्ही मतदारसंघांतील मतदारांची संख्या अनुक्रमे १५ लाख आणि १२ लाख अशी आहे. पंचकुलामध्ये सर्वाधिक कमी ३.८६ लाख एवढे मतदार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth will be Kingmaker in Haryana Assembly elections