'युवराज'ची किंमत तब्बल 9.25 कोटी!

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

अलाहाबाद (उत्तर प्रदेश)- चित्रकूट येथे म्हशींच्या विक्रीसाठी भरविण्यात आलेल्या ग्रामोद्योग मेळाव्यात 'युवराज' नावाच्या रेड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, त्याची किंमत तब्बल 9.25 कोटी एवढी आहे.

ग्रामोद्योग मेळाव्यात विविध ठिकाणांहून म्हशी व रेडे आणण्यात आले आहेत. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात म्हशी व रेड्यांची विक्री होत असते. एका इंग्रजी वृत्तवाहिनेने दिलेल्या वृत्तानुसार 'युवराज' या रेड्याची किंमत 9.25 कोटी एवढी आहे.

वृत्तामध्ये पुढे म्हटले आहे की, 'युवराज'ला दररोज खुराक म्हणून 20 लिटर दूध, 10 किलो फळे (विशेषता सफचरंद), 5 किलो ओला व 5 किलो सुका चारा दिला जतो. शिवाय, दररोज 5 कि.मी. चालविले जाते. 11.5 फूट लांब व 5.8 फूट उंच असलेल्या 'युवराज'चे वजन 15 क्लिंटल एवढे आहे. तो नऊ वर्षांचा आहे.

हरियाणा येथील करमवीर सिंग यांच्या मालकीचा 'युवराज' असून, तो कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे असल्याचे सांगतात. त्याच्यावर दररोज 3 ते 4 हजार रुपये खर्च केला जातो. ग्रामोद्योग मेळाव्यात त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Web Title: 'Yuvraj' This buffalo is worth Rs 9.25 crore