आमीर बोलला; झायरा, you are a role model!

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

तुझे भविष्य चांगले असून, तू हुशार, युवा, मेहनती आणि धाडसी मुलगी आहेत. तु भारतातच नाही तर जगभरात सर्वांसाठी आदर्श आहेस. माझ्याकडून तुला शुभेच्छा. माझे सर्वांना सांगणे आहे, की तिला एकटे सोडावे आणि तिचा आदर करावा.

नवी दिल्ली - मी झायराची प्रतिक्रिया वाचली आणि समजू शकतो की तिने कोणत्या परिस्थितीत ही प्रतिक्रिया दिली असेल. झायरा तू आमची आदर्श आहे. आम्ही तुझ्यासोबत आहोत, असे सांगत अभिनेता आमीर खानने झायरा वासिमला पाठिंबा दिला. 

आमीरने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की तुझे भविष्य चांगले असून, तू हुशार, युवा, मेहनती आणि धाडसी मुलगी आहेत. तु भारतातच नाही तर जगभरात सर्वांसाठी आदर्श आहेस. माझ्याकडून तुला शुभेच्छा. माझे सर्वांना सांगणे आहे, की तिला एकटे सोडावे आणि तिचा आदर करावा. ती फक्त 16 वर्षांची असून, ती आयुष्याशी संघर्ष करत आहे.

आमीर खानच्या 'दंगल'मध्ये कुस्तीगीर गीता फोगट हिची लहानपणीची भूमिका करणारी झायरा वासिम हिने जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यानंतर काश्मीरमधील तरुणांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. झायराने या प्रकरणी माफी मागितल्यानंतर तिच्या समर्थनार्थ गीता फोगटने माफी मागण्याची गरजच नव्हती, असे म्हटले आहे. आमीरकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात न आल्याने त्याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. आता आमीरने झायराला पाठिंबा देत ती जगभरात आदर्श असल्याचे म्हटले आहे.

झायरा वासिम हिने मेहबूबा मुफ्तीची भेट घेतल्यानंतर विशेषतः काश्‍मीरमधील तरुणांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे या आक्षेपार्ह कृतीबद्दल अन्‌ जनतेच्या भावना नकळत दुखावल्याने तिने सोशल मीडियावरून माफी मागतिली होती. मात्र, नंतर तिने माफीचे ट्विट काढून टाकले. गीता फोगटने झायराला पाठिंबा देत झायरा ही चांगली मुलगी असून, ती देशासाठी एक आदर्श आहे. त्यामुळे तिने माफी मागण्याची गरजच नाही, असे म्हटले आहे. 

काश्‍मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता झायराने मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्याने तरुणांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तिने माफी मागितली होती. तसेच 'दंगल'मधील तिच्या भूमिकेविषयीही नाराजी व्यक्त करून याबद्दल आपल्याला अभिमान वाटत नसल्याचे तिने स्पष्ट 'फेसबुक'वरून व्यक्त केले होते. "मी सर्वांची माफी मागते. ही कृती आपण जाणीवपूर्वक केलेली नाही. मी केवळ 16 वर्षांची आहे आणि हे लक्षात घेऊन लोक मला समजून घेतील अन्‌ माफ करतील, असेही तिने म्हटले होते. काश्‍मिरी युवकांसाठी झायराला आदर्श मानले जाते. याबाबत तिने म्हटले आहे, की माझे अनुकरण कुणीही करू नये. तसेच आपला आदर्शही कोणी ठेवू नये, अशी आपली इच्छा होती.

झायराच्या या ट्विटवरून नागरिकांनी अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांना लक्ष्य केले होते. झायराबाबत होत असलेल्या असहिष्णुतेवर आमीर गप्प का? तो झायराबाबत काढलेल्या फतव्याला घाबरला का?, असे प्रश्नही उपस्थित होत होते. दुसरीकडे गीतकार जावेद अख्तर यांनी झायराची बाजू घेत छतावर उभे राहून स्वातंत्र्याचे नारे देणाऱ्यांना दुसऱ्याचे स्वातंत्र्य मान्य नाही. झायराला मिळालेल्या यशाबद्दल तिला माफी मागायला लावणे, लाजीरवाणे आहे.

Web Title: zaira doesnt need to apologise for anything says geeta phogat dangal aamir khan jammu and kashmir mehbooba mufti