'त्या' पेंटिंगशी माझी तुलना नको- झायरा वसीम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

नवी दिल्ली : "हिजाबमधील महिलादेखील सुंदर आणि मुक्त असतात. 'त्या' चित्रात रंगविण्यात आलेल्या गोष्टीशी माझा दूर-दूरपर्यंत संबंध नाही," अशा शब्दांत युवा अभिनेत्री झायरा वसीम हिने केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री विजय गोयल यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. 

रुढींमध्ये जखडलेल्या मुस्लिम तरुणींच्या सामाजिक स्थितीवर भाष्य करणारे एक चित्र गोयल यांनी ट्विट केले होते. त्यावर त्यांनी म्हटले आहे की, "हे चित्र झायरा वसीमशी साधर्म्य असणारी कहानी सांगत आहे. आमच्या मुली पिंजरा तोडून प्रगती करू लागल्या आहेत. मुलींना अधिक शक्ती मिळो."

गोयल यांच्या विधानाला ट्विटरवर अनेकांनी स्वागत केले. मात्र, स्वतः झायराने वेगळे मत व्यक्त केले. 
झायरा त्या ट्विटला प्रतिक्रिया देताना म्हणाली, "तुमचा पूर्ण आदर ठेवून मला वाटते की मी तुमच्याशी असहमती दर्शवायला पाहिजे. मी तुम्हाला विनंती करते की, मला अशा असभ्य चित्रणाशी जोडू नये." 

दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये आयोजित भारतीय कला महोत्सवाचे उद्घाटन गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये 100 पेक्षा अधिक स्टॉल असून, 6 विविध देशांतील चार हजारहून अधिक कलाकार सहभागी झाले आहेत. त्या प्रदर्शनातील हे चित्र पाहतानाचे छायाचित्र गोयल यांनी शेअर केले आहे. 
 
Web Title: zaira wasim differs with vijay goel about muslim girls

फोटो गॅलरी