कर्मचाऱ्याने म्हटले, 'हिंदी राष्ट्रीय भाषा', झोमॅटोने मागितली ग्राहकाची माफी

zomato
zomatosakal

नवी दिल्ली : ऑनलाइन फूड डिलिव्हर कंपनी झोमॅटोचे (Zomato) कस्टमर केअर अधिकारी आणि तमिळनाडूतील ग्राहकामध्ये ट्विटरवर (twitter) चांगलाच वाद रंगला आहे. झोमॅटोच्या कर्मचाऱ्याने खोटारडा म्हटले असून प्रत्येकाला हिंदी भाषा यायला पाहिजे, असं म्हटल्याचा आरोप ग्राहकाने केला आहे. त्याचा स्क्रिनशॉट शेअर करत ग्राहकाने हे आरोप केले आहेत. त्यानंतर झोमॅटोने ग्राहकाची माफी मागितली.

zomato
प्यार किया तो डरना क्या! खासदारांचा तरुणांना प्रेमविवाहाचा सल्ला

विकास असे ग्राहकाचे नाव असून त्यांनी झोमॅटोवरून फूड ऑर्डर केले होते. मात्र, ऑर्डर केलेल्या फूडपैकी एक पदार्थ त्यामध्ये कमी होता. त्यामुळे विकास यांनी झोमॅटोच्या कस्टमर केअरसोबत संपर्क साधला. ग्राहकाने पैसे परत करण्याची मागणी केली. त्यावेळी झोमॅटोच्या कर्मचाऱ्याने रेस्टॉरंटला पाचवेळा फोन केला. मात्र, त्यांना भाषेमुळे समस्या समजू शकली नाही, असं उत्तर दिलं. मात्र, भाषा ही माझी समस्या नसून तुमची समस्या आहे. मला माझं ऑर्डर केलेलं फूड द्या नाहीतर पैसे परत द्या, असं ग्राहकाने म्हटलं. ''हिंदी ही राष्ट्रीय भाषा असून ती प्रत्येकाला यायला पाहिजे'' असं कर्मचाऱ्याने म्हटले. पण, झोमॅटो तमिळनाडूमध्ये सेवा देत असेल तर त्यांच्या कर्मचाऱ्यांना तमिळ यायला पाहिजे, असं ग्राहकाने म्हटले. याबाबत विकास यांनी ट्विट केले असून ते ट्विट क्षणात व्हायरल झाले. त्यानंतर झोमॅटोने त्याला उत्तर देत आम्ही समस्या सोडवू, असं म्हटलं. मात्र, कंपनीने माफी मागावी, असं ग्राहकाने म्हटलं. त्यानंतर झोमॅटोने आपल्या कर्मचाऱ्याच्या चुकीबद्दल माफी मागितली.

दरम्यान, ग्राहकाचे ट्विट व्हायरल होताच त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ग्राहक उगाच गोष्टी वाढवत असल्याची टीका अनेकांनी केली, तर कर्मचाऱ्याने हिंदी शिकायला सांगणे हे अत्याचारीपणा आहे, असं म्हणत अनेकाने ग्राहकाचे समर्थन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com