'झोमॅटो', 'स्विगी'चा तब्बल हजारो रेस्टॉरंटला दणका

Zomato, Swiggy delist over 10000 restaurants
Zomato, Swiggy delist over 10000 restaurants

नवी दिल्ली : 'झोमॅटो' आणि 'स्विगी'वरून जेवण मागवणं, हा हल्लीच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. पण यापुढे 'झोमॅटो' आणि 'स्विगी'वरून काही मागवणार असाल, तर कदाचित तुमचे हॉटेलचे पर्याय कमी असतील, यासाठी मनाची तयारी ठेवा. कारण देशभरातील दहा हजारांहून अधिक हॉटेल व्यावसायिक आता या दोन ऍपवर उपलब्ध नसतील. अन्न सुरक्षा कायद्याच्या मानकांचे पालन न करणाऱ्यांना 'झोमॅटो', 'स्विगी'सह 'फूडपांडा', 'उबेर इट्‌स' या 'फूड ऍग्रिगेटर'ने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 

'झोमॅटो'ची डिलिव्हरी करणाऱ्याने रस्त्यातच अन्न उष्टे केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अन्न घरपोच देण्याची ही सगळी प्रक्रिया चर्चेत आली होती. त्यानंतर 'फूड ऍग्रिगेटर' कंपन्यांनी कडक धोरण स्वीकारले आहे. 

अन्न सुरक्षेसाठीच्या कायद्यातील मानकांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्सवर बंदी घालण्याचे आदेश सरकारने दिले. त्यानंतर 'स्विगी'ने त्यांच्या यादीतून सर्वाधिक 4,000 हॉटेल्स वगळली. त्यापाठोपाठ झोमॅटो (2,500), उबेरइट्‌स (2,00) आणि फूडपांडा (1,800) या फूड ऍग्रिगेटर्सनेही कारवाई केली आहे. त्यामुळे या सुरक्षेच्या निकषांचे पालन न करणारी हॉटेल्स आता 'झोमॅटो', 'स्विगी'वर उपलब्ध नसतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com