"टीईटी' नसलेल्या शिक्षकांना संरक्षण द्या! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

  • शिक्षक आमदार कपिल पाटील यांची मागणी
  • शिक्षक संघटनांची राज्य सरकारकडे मागणी 

मुंबई : राज्यातील शिक्षण पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची नोकरी नव्या वर्षात धोक्‍यात येणार आहे. यामुळे विविध शिक्षण संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. टीईटी उत्तीर्ण नसलेल्या आठ हजार शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही केली आहे.

पालकांनो तुमचं काम होणार सोपं! शिक्षण विभागानं घेतला हा निर्णय 

टीईटी उत्तीर्ण नसलेल्या आठ हजार शिक्षकांची नोकरी नवीन वर्षात धोक्‍यात आली आहे. नव्या शिक्षणमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पदवीधर शिक्षकांचे समायोजन कसे करता येईल, याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या या निर्णयावरून शिक्षकांनी घाबरू नये, आम्ही त्यांच्या मागे आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.

या App ने टाकले फेसबुकलाही मागे - वाचा संपुर्ण बातमी

शिक्षकांची नियुक्ती शाळांनी आणि मान्यता देतांना शिक्षणाधिकारी कार्यालयांनी महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील तरतुदीचा अवलंब केल्याने अचानक त्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्याचे बंधन करणे हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. त्यामुळे 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेच्या अटीतून वगळून त्यांचे वेतन थांबविण्याचे शिक्षण संचालनालयाचे आदेश तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी भाजपा शिक्षक सेलने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protect Teachers Who Are Not 'TET!