2021 मधील टॉप 10 पगाराचे जॉब; झटक्यात व्हाल श्रीमंत

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 28 December 2020

डिजिटल जगात तुमच्यात कौशल्य असल्यास तुम्हाला भरगच्च पगाराचे जॉब मिळू शकतो.

इंटरनेटच्या क्रांतीनंतर जग असामान्यरित्या बदलले आहे. तंत्रज्ञानामुळे अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. डिजिटल जगात तुमच्यात कौशल्य असल्यास तुम्हाला भरगच्च पगाराचे जॉब मिळू शकतो. तुमचं उत्पन्न झपाट्याने वाढवायचं असल्यास खालील जॉब तुमची वाट पाहात आहेत. 

1. डाटा साईंटिस्ट (Data Scientist)

- हा 2021 शतकातील सर्वात टॉप पेड जॉब आहे. वेगवेगळ्या सांख्यिकीय पद्धती वापरणे, डाटा अनालायसीस टेकनिक माहिती असणे यात आवश्यक आहे. डाटा साईंटिस्टला Python, R आणि Java सारखी प्रोग्रॅमिग भाषा येणे गरजेचं असतं. या जॉबसाठी तुम्हाला वर्षाला 90 लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज मिळू शकतं. 

2. प्रोडक्ट मॅनेजर (Product Manager)

- प्रोडक्ट डेव्हलप करण्याची जबाबदारी प्रोडक्ट मॅनेजरवर असते. प्रोडक्ट यशस्वी होण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका असते. त्यांना मार्केट ट्रेंड, कॉम्पिटिशन याची जाण असायला हवी. प्रोडक्ट मॅनेजरला वर्षाला 1 कोटीपर्यंतचे पॅकेज मिळू शकते. 

3. क्लाऊड आर्किटेक (Cloud Architect)

- क्लाऊड आर्किटेक आयटी तज्ज्ञ असून तो क्लाऊड कॉम्पुटिंग सिस्टिम आणि क्लाऊड अॅपलिकेशन डिझाईनवर काम करतो. योग्य टेकनॉलिजी बिल्ड करण्यात आली आहे ना, याची तो खात्री करतो. त्याला  Python, R आणि Java सारखी प्रोग्रॅमिंग भाषा येणे आवश्यक आहे. त्याला वार्षिक 30-50 लाखांचे पॅकेज मिळू शकते. 

4. फूल स्टॅक डेव्हलपर ( Full Stack Developer)

- फूल स्टॅक डेव्हलपर पुढे आणि बॅक इंड असे दोन्ही स्तरावर वेबसाईटसाठी काम करत असतो. तो प्रोजेक्ट बनवत असताना क्लाईंटसोबत काम करतो. तुम्हाला HTML आणि CSS ची जाण असणे आवश्यक आहे. तुम्हाला वार्षिक 35 लाख रुपयांपर्यंतचा पगार मिळू शकतो.

5. बिग डेटा इंजिनिअर ( Big Data Engineer)

-बिग डेटाने गेल्या 10 वर्षात प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती आणली आहे. बिग डेटा इंजिनिअर स्टोर, प्रोसेस आणि डाटा अनालायसिस करतो. संस्थेमध्ये विकास, डिझाईन, टेस्ट आणि डेटा मेंटेन ठेवण्याचं त्याचं काम असतं. भारतामध्ये अशा कामासाठी वर्षाला 30 लाख रुपये मिळू शकतात. 

6. डेव्हलप इंजिनिअर (DevOps Engineer)

- डेव्हलप इंजिनिअर डेव्हपर्स आणि आयटी टीमसोबत काम करतात. सॉफ्टवेअरच्या विकासासाठी ते आवश्यक ते काम करतात. डेव्हलप इंजिनिअरकडे चांगली प्रोग्रॅमिंग स्कील असणे आवश्यक आहे. भारतामध्ये डेव्हलप इंजिनिअरला 40 लाख वार्षिक मिळतात. 

7. ब्लॉकचेन डेव्हलपर ( Blockchain Developer)

- ब्लॉकचेन डेव्लपर रिसर्च, डिझाईन, डेव्हलप आणि ब्लॉकचेन टेकनॉलॉजी टेस्ट करतो. सायबर अॅटेक होऊ नये यासाठी सुरक्षा ठेवण्याचं त्याचं काम असतं. ब्लॉकचेन डेव्लपर प्रोग्रॅमिंगचं मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याला वार्षिक 22 लाख रुपये मिळू शकतात.  

9 मोबाईल अॅपलिकेशन डेव्हलपर (Mobile Application Developer)

- मोबाईल अॅपलिकेशन डेव्हलपर iOS आणि Android साठी अॅपलिकेशनचा शोध लावत असतो. नवीन फिचर्स बिल्ड करण्यासाठी ते प्रोडक्ट डेव्हलपमेंट टीमसोबत काम करतात. त्यांना भारतामध्ये 30 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळते. 

9. आरपीए डेव्हलपर RPA Developer

- आरपीए सिस्टिम क्रियेट, डेव्हलप आणि इम्प्लिमेंट करण्याचे काम आरपीए डेव्हलपर करतो. ऑटोमॅटिक प्रोसेसची इफेशियन्सी वाढवण्यासाठी तो प्रयत्न करतो. आरपीए डेव्हलपरला C++, .NET भाषा माहिती असण आवश्यत आहे. त्याला भारतात जवळपास 11 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळते. 

10. इन्फॉर्मेशन सेक्यूरिटी अॅनालिस्ट

- कॉम्प्युटर सिस्टिम सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. इन्फॉर्मेशन सेक्यूरिटी अॅनालिस्ट नेटवर्किंग आणि firewalls, proxies आणि  IDPS च्या कंसेप्ट त्याला माहिती हवी. अशा कामासाठी भारतात वार्षिक तीन लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 highest paying jobs of 2021 you will be rich