अकरावी प्रवेशासाठी १३ हजार विद्यार्थ्यांनी केला अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eleventh admission
अकरावी प्रवेशासाठी १३ हजार विद्यार्थ्यांनी केला अर्ज

अकरावी प्रवेशासाठी १३ हजार विद्यार्थ्यांनी केला अर्ज

पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दोन दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी मंगळवारी दुपारपर्यंत जवळपास १३ हजार ७९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीला प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या अंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा सोमवारपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात दुसऱ्या दिवसांपर्यंत १३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना ‘मॉक डेमो रजीस्ट्रेशन’अंतर्गत सराव करण्यासाठी मागील आठवड्यात मुभा देण्यात आली होती. त्यानंतर आधीची सराव अर्ज प्रक्रियेतील सर्व माहिती नष्ट करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची अर्ज नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये जवळपास चार हजार ३५७ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरून अर्ज लॉक केला आहे. त्यातील तीन हजार ११० विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी (व्हेरिफाय) झाली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी

नोंदणी दरम्यान माहितीत बदल नसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांनी मागील वर्षाच्या व्हेरिफाइड कॉपीसह स्वयं घोषणापत्र अपलोड करावे. तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीत बदल असल्यास त्यांनी बदल करण्यापूर्वीच्या संकेतस्थळावरील माहितीची प्रिंट काढावा. आवश्यक बदल करून बदलाबाबतचे सर्व आदेश अपलोड करावेत. बदलानंतरच्या माहितीची प्रिंट काढावी आणि दोन्ही प्रिंट व अपलोड केलेली कागदपत्रे यांची हार्ड कॉपी ७ ते १७ जून या कालावधीत फडके हौद चौकातातील आर. सी. एम. गुजराथी हायस्कूल येथे शिबिरात मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रमाणित करून घ्यावेत, असे आदेश इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समिती सदस्य सचिव मीना शेंडकर यांनी दिले आहेत.

कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रशिक्षण

कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य आणि ऑनलाइन प्रवेशाचे काम करणाऱ्या व्यक्ती यांचे प्रशिक्षण येत्या बुधवारी (ता.१) फडके हौद चौकातील आर.सी.एम. गुजराथी हायस्कूल येथे सकाळी अकरा वाजता आयोजित केले आहे. या प्रशिक्षणास संबंधित व्यक्तींनी उपस्थित राहावे,’’ असे आवाहन शेंडकर यांनी केले आहे.

Web Title: 13000 Students Applied For 11th Admission Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top