
माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि हिरो ग्रुपचे सुनील आणि पवन मुंजाळ हे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. या शाळेची फी नऊ लाख पंचवीस हजार रुपये आहे.
पुणे : प्रत्येक पालकांचे स्वप्न असते की आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे, ज्यासाठी ते हरप्रकारे प्रयत्न करत असतात. त्यांची आणि त्यांच्या मुला-मुलींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी देशात अनेक शाळा आहेत. पण काही अशा बऱ्याच मोठ्या आणि महागड्या शाळा आहेत, त्यांच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ या.
डून स्कूल, डेहराडून -
डून व्हॅलीमध्ये स्थित या शाळेची स्थापना १९२९ मध्ये करण्यात आली. ही फक्त मुलांची शाळा असून देशातील श्रीमंत घरांतील मुले या शाळेत शिकण्यासाठी येतात. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि हिरो ग्रुपचे सुनील आणि पवन मुंजाळ हे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. या शाळेची फी नऊ लाख पंचवीस हजार रुपये आहे.
सिंधिया स्कूल -
मुकेश अंबानी, सलमान खान आणि अनुराग कश्यप यांनी ग्वाल्हेरमध्ये असलेल्या या शाळेतून शिक्षण घेतले आहे. येथे वर्षाची फी 7 लाखाहून अधिक आहे.
मेयो कॉलेज -
अजमेरमध्ये असणारी ही मुलांची शाळा आहे. या शाळेत घोडेस्वारी, पोलो ग्राऊंड, गोल्फ कोर्स इत्यादी प्रसिद्ध खेळ आहेत. प्रसिद्ध पत्रकार व्ही. संघवी आणि जसवंत सिन्हा यांनी या शाळेत धडे गिरवले आहेत. येथे वार्षिक फी पाच लाख रुपये आहे.
इकोल माँडियल वर्ल्ड स्कूल -
मुंबईतील या शाळेत प्राथमिक ते डिप्लोमापर्यंतचे शिक्षण दिले जाते. येथे वर्षासाठी 11 लाख रुपये फी आकारली जाते.
वेल्हॅम बॉईज स्कूल -
डून व्हॅलीमधील या शाळेत माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर, ओडिशाचे सीएम नवीन पटनायक, पंजाबचे सीएम कॅप्टन अमरिंदर सिंग, विक्रम सेठ आणि संजय गांधी यांनी शिक्षण घेतले आहे. येथे वर्षासाठी 5 लाख 70 हजार रुपये फी आकारली जाते.
वुडस्टोक स्कूल -
अभिनेता टॉम अल्टर आणि लेखक नयनतारा सेहगल यांनी मसूरी येथील या शाळेत शिक्षण घेतले आहे. येथे वार्षिक फी 15 लाख रुपये आहे.
गुड शेफर्ड स्कूल -
उटी येथे असलेल्या या शाळेची फी 10 लाख रुपये आहे.
- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)