
SSC Result : दहावी निकालात इंग्लिश स्कूलची अभिज्ञा राक्षे राज्यात पहिली
मंगळवेढा - महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 96. 56% इतका लागला असून 27 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. मंगळवेढ्यातील इंग्लिश स्कुलची अभिज्ञा विरेद्र राक्षे हिने 100 टक्के गुण मिळवून राज्यात पहिली आली.
या परीक्षेसाठी 3325 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी 3287 विद्यार्थी परीक्षेला बसले 1439 विद्यार्थी विशेष श्रेष्ठ्रेणीत उत्तीर्ण झाले तर 1208 विद्यार्थी प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले 449 विद्यार्थी बी श्रेणीत तर 78 विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले गणेश विद्यालय गणेशवाडी या शाळेचा निकाल तालुक्यात सगळ्यात कमी लागला.
शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे इंग्लिश स्कूल मंगळवेढा 96.03, नूतन हायस्कूल बोराळे 95.40, हनुमान विद्यामंदिर मरवडे 98.16, जवाहरलाल हायस्कूल 98.16, विद्या मंदिर हायस्कूल सलगर बुद्रुक 95.37, इंग्लिश स्कूल भोसे 98.16, सिद्धेश्वर विद्यामंदिर माचनूर 98.11, बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर 98.27, महालिंगराया हायस्कूल हुलजंती 97.56, कामसिद्ध विद्यालय खुपसंगी 97.14, आंधळगाव प्रशाला आंधळगाव 94.44, माध्यमिक आश्रम शाळा बालाजी नगर 94.94, महासिद्ध विद्यामंदिर डोणज 2019 भैरवनाथ विद्यालय 97.72, वेताळ विद्यामंदिर शिरशी 89.28 ,सद्गुरु बागडे बाबा विद्यामंदिर बावची 98.64, केंद्रीय निवासी विद्यालय तळसंगी 63.29,माध्यमिक आश्रम शाळा पडोळकरवाडी 98.43, शरण बसवेश्वर विद्यामंदिर नंदुर 95.12 स्वामी विवेकानंद विद्यालय गोणेवाडी 90.49,मराठी ताराराणी गर्ल हायस्कूल मंगळवेढा 81.25
शंभर टक्के निकालाच्या शाळा
श्री संत दामाजी हायस्कूल मंगळवेढा, लक्ष्मीदेवी हायस्कूल लक्ष्मी दहिवडी, इंग्लिश स्कूल निंबोणी,माध्यमिक आश्रम शाळा हुन्नूर,लक्ष्मी देवी विद्यामंदिर रड्डे, संगम विद्यालय डोंगरगाव, बाळकृष्ण विद्यालय भाळवणी, सिद्धनाथ विद्यालय लेंडवे चिंचाळे, स्वामी विवेकानंद विद्यालय गुंजेगाव, शारदा- सिध्दनाथ विद्यालय पाटखळ, एम.पी.मानसिंगका विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सोड्डी, लक्ष्मण दादा आकळे, विद्यालय हाजापूर, शरदचंद्रजी पवार विद्यालय मल्लेवाडी, विलासराव देशमुख प्रशाला कारखाना साईट, माध्यमिक शाळा येड्राव- खवे,रेवणसिद्ध स्वामी विद्यामंदिर तळसंगी, सर्वोदय विद्यालय शिवनगी, विद्यानिकेतन विद्यालय जालीहाळ-हिवरगाव, छत्रपती शिवाजी विद्यामंदिर खोमनाळ, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम मंगळवेढा, उदयसिंह मोहिते इंग्लिश मीडियम मंगळवेढा, ज्ञानदीप विद्यालय मंगळवेढा, बापूराव जाधव, शरदचंद्रजी कृषी विद्यालय मारापुर, श्रीपतराव माने विद्यालय लवंगी, जुनोनी विद्यालय जुनोनी.