जाहिरात क्षेत्रात करीअर करायचे आहे? ॲड गुरू पियुष पांडे यांच्या १५ टिप्स |Career In Advertising | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

piyush pandey
जाहिरात क्षेत्रात करीअर करायचे आहे? ॲड गुरू पियुष पांडे यांच्या १५ टिप्स |Career In Advertising

जाहिरात क्षेत्रात करीअर करायचे आहे? ॲड गुरू पियुष पांडे यांच्या १५ टिप्स

विनोद राऊत

काही जाहिराती (Advertising) मनावर राज्य करतात. त्या दिर्घकाळ आठवणीत राहतात. ‘कुछ खास है! हम सभी मै!’ थेट हृदयाला भिडणारी कॅडबरीची (Cadbury) जाहिरात असो की फेविकॉल, ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ची मोहीम अशा अनेक जाहीरातींनी लोकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या जाहिराती करताना खूप क्रिएटिव्ह विचार करणे गरजेचे असते. तुमच्यात जर आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करण्याची, आपलं म्हणणं लोकांना थेट पण नेमक्या शब्दात सांगायची कला असेल तर तुम्ही नक्कीच यात चांगलं करिअऱ करू शकता. यासाठी देशातील आघाडीचे ॲड गुरू पियुष पांडे यांनी काही टिप्स दिल्या आहेत. त्या वाचल्यास तुम्हाला नक्की फायदा होईल.

हेही वाचा: प्रेक्षकांचा आदर करणं, जाहिरातीचा पहिला नियम!

1) दर्शकांवर आपल्या वैयक्तीक आवडीनिवडी थोपवू नका. जर तूमचा आणि दर्शकाची आवड, विचार जुळत असेल तर परमेश्वराला धन्यवाद द्या आणि पुढे चला.

2) कायम नव्या बदलासाठी तयार सज्ज रहा, त्याकडे सकारात्मक नजरेने बघा,आपल्या मेंदुच्या खिडक्या कायम उघड्या ठेवा

3) काळ कितीही बदलला तरी जाहिरात क्षेत्रात आयडीया सुचणे,याला पर्याय नाही

4) आपले डोळे, कान खुले ठेवा आणि पाय जमीनीवर, जास्त हवेत उडू नका

5) कथानकात दम नसेल तर मोठ्यातला मोठा सेलिब्रिटी तूमच्या जा वाचवू शकणार नाही.

हेही वाचा: 50 लाख जिंकण्याची सुवर्णसंधी! तुमची एक कल्पना बनवेल तुम्हाला करोडपती

6) तूमच्या प्रेक्षकांचा, विचाराचा सन्मान करणे, हा जाहिरातीचा पहिला नियम आहे.

7) ज्याप्रमाणे स्पीड ब्रेकरवर वेग कमी करावा लागतो,ब्रेकर संपला की गाडी वेग घेते. एखाद्या वेळी आयडीया सुचत नसेल तर स्पीड ब्रेकरचा विचार करा.

8) हिमालय चढत असताना त्याच्यावर फोकस करा, उगाच समुद्र पार करण्याचा विचार करु नका.जे समोर आहे त्यावर फोकस करा.

9) स्वता:ला एडजस्ट करणं हे एक आव्हान असतं आणि हे आव्हान म्हणजे एक मोठी संधी.

10) कुठल्याही चुकीच्या गोष्टीला थोड थांबवल की त्या कृतीचा वेग कमी होतो.

हेही वाचा: स्टार्टअप्स देणार 20 लाख लोकांना रोजगार! असा आहे सरकारचा प्लॅन

11) सोशल मिडीया एक मच्छरासारखा आहे. म्हणून मी कायम खिशात ओडोमॉस ठेवतो.

12) जाहिरात सरकार बदलू शकत नाही हे समजून घ्या. तूमचा संदेश दमदार पध्दतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचे ते फक्त एक माध्यम आहे.

13) कॅडबरीच्या जाहिरातीचा विचार केवळ चॉकलेटपुरता मर्यादीत नव्हता, There is something beautiful in every human being.

14) कामाच्या फेवरेट यादीसाठी तूम्हाला केवळ काम आठवत असेल त्यावेळी तातडीने निवृत्त व्हा.

15) माझ्या मिशीवर एक नया पैसा खर्च केला नाही. पिळदार मिशी ठेवण्यामागे कुठलाही हेतू नव्हता. लोक आनंद घेतात, माझी काही हरकत नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top