Education News : कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

दहावी- बारावी बोर्ड परीक्षा : आज संस्थाचालकांची विशेष बैठक
Administration Action Mode for Copy Free Examination 10th- 12th Board Exam Special Meeting
Administration Action Mode for Copy Free Examination 10th- 12th Board Exam Special Meetingsakal

जालना : दहावी- बारावी बोर्ड परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. दोन दिवसापूर्वी प्राचार्य आणि केंद्रसंचालकाची बैठक पार पडली. मंगळवारी ( ता.१४ ) जिल्ह्यातील संस्थाचालकांची, माध्यम प्रतिनिधीची बैठक बोलाविण्यात आली आहे.

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीनंतर मागील वर्षी होम सेंटर पद्धतीने दहावी- बारावी बोर्ड परीक्षा पार पडल्या.यंदाच्या बोर्ड परीक्षा राज्य मंडळाच्या प्रचलित केंद्र पद्धतीने होणार आहे. दहावी- बारावी बोर्ड परीक्षेसाठी राज्य मंडळाने विशेष सूचना जारी करीत परीक्षेतील गैरप्रकाराबाबत दक्षता घेण्यासाठी निर्देशित केले आहे.

तीन दिवसांपूर्वी राज्याचे सचिवांनी दूरदृष्श प्रणालीद्वारे संबंधित विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना परीक्षेसंदर्भात विशेष सूचना जारी केल्या आहेत. वरिष्ठांकडून आदेश आल्याने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,औरंगाबाद विभागीय मंडळाचे अधिकारी यांनी जिल्ह्यातील केंद्रसंचालकाची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.

दहावी- बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात दोनच दिवसांनी पुन्हा औरंगाबाद विभागीय मंडळात शिक्षणाधिकारी यांची सोमवारी ( ता.१३) बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील दहावी- बारावी बोर्ड केंद्र असलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय संस्थाचालकांची तातडीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी मंगळवारी ( ता.१४) सकाळी १० वाजता बोलाविली आहे.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्ह्यातील संस्थाचालकांची बैठकीत बोर्ड परीक्षेदरम्यान होण्याऱ्या गैरप्रकारांना कसा आळा बसविता येईल, कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा कशा होतील,यासाठी संस्थाचालकांची भूमिकाही महत्त्वाची मानली जाणार आहे.

जिल्ह्यातील दहावी- बारावी बोर्ड परीक्षेच्या केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. एकाच आठवड्यात तीन बैठक झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी संस्थाचालकांची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

— मंगल धुपे, शिक्षणाधिकारी,जालना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com