esakal | प्रादेशिक सेना परिक्षेसाठीचे प्रवेश पत्र जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

प्रादेशिक सेना परिक्षेसाठीचे प्रवेश पत्र जाहीर

प्रादेशिक सेना परिक्षेसाठीचे प्रवेश पत्र जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय लष्कराच्या प्रादेशिक सेना म्हणजेच टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी पदासाठीच्या परिक्षेसाठी प्रवेश पत्रे जाहीर करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेश पत्र अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.

ही परिक्षा येत्या २६ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. परिक्षेसाठी जबलपूर, पुणे, दिल्ली, लखनौ, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकता, आग्रा, दार्जिलिंग, गुवाहाटी, श्रीनगर आदी केंद्र नेमण्यात आले आहेत. दरम्यान उमेदवारांना नेमण्यात आलेल्या परिक्षा केंद्रावर सकाळी आठ वाजता हजर राहण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर प्रवेश पत्राशिवाय कोणत्याच उमेदवाराला या परिक्षेत भाग घेता येणार नसल्याची नमूद करण्यात आले आहे. हे प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी प्रादेशिक सेनेच्या www.jointerritorialarmy.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.

loading image
go to top