पुणे विद्यापीठात बी. व्होकेशन कोर्ससाठी अ‍ॅडमिशन सुरू

रिटेल मॅनेजमेंट, मॅन्युफॅक्चरिंग स्किल्स,रिन्युएबल एनर्जी स्किल्स
admission
admission

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रातर्फे बी. व्होकेशन इन रिटेल मॅनेजमेंट, बी. व्होकेशन इन मॅन्युफॅक्चरिंग स्किल्स आणि बी. व्होकेशन इन रिन्युएबल एनर्जी स्किल्स या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना सात ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

विज्ञान शाखा, व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा एमसीव्हीसी यातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येणार आहे. हे अभ्यासक्रम तीन वर्षांचे असणार आहेत. विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह १० ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक आणि तारीख विद्यापीठातर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ही प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून, त्यासाठी एक तासाचा कालावधी असणार आहे. प्रवेश परीक्षेचे स्वरूप हे बहुपर्यायी प्रश्नांचे असून १०० गुणांसाठी ही परीक्षा होणार आहे. यात सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांना २० गुण, तर संबंधित विषयांशी संलग्न प्रश्नांना ८० गुण असणार आहेत.

admission
पुणे : ग्रामीण भागात निम्म्याहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण

बी. व्होकेशन इन मॅन्युफॅक्चरिंग स्किल्स, बी. व्होकेशन इन रिन्युएबल एनर्जी स्किल्स या अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी ५०, तर बी. व्होकेशन इन रिटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी ८० जागा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx या लिंकवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या http://www.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com