JEE Advance परीक्षेचं Admit Card 'या' दिवशी होणार जाहीर

JEE Advanced 2021
JEE Advanced 2021esakal

JEE Advanced 2021 : संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Advanced 2021) भारतीय तंत्रज्ञान संस्था, आयआयटी खडगपूरद्वारे आयोजित केली जाईल. या परीक्षेसाठी IIT JEE प्रवेशपत्र 25 सप्टेंबर 2021 रोजी प्रसिध्द होईल. अधिकृत माहितीनुसार, प्रवेशपत्र सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, उमेदवार jeeadv.ac.in या वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.

Summary

संयुक्त प्रवेश परीक्षा भारतीय तंत्रज्ञान संस्था, आयआयटी खडगपूरद्वारे आयोजित केली जाईल.

जेईई मेन्सच्या पात्र सर्व उमेदवारांसाठी 3 ऑक्टोबर 2021 रोजी ही परीक्षा आयोजित केली जाईल. उद्या जाहीर होणाऱ्या प्रवेशपत्रात वैयक्तिक माहिती, ठिकाण, वेळ इत्यादी सर्व महत्वाचे तपशील असतील. तर, परीक्षा संपल्यानंतरही उमेदवारांनी ते प्रवेशपत्र सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे.

JEE Advance 2021 : अर्ज कसा करावा?

  1. उमेदवाराने प्रथम jeeadv.ac.in वर जाऊन JEE Advanced 2021 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

  2. आता मुख्यपृष्ठावर जेईई मेन 2021 लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन विंडोवर नोंदणी करावी.

  3. आता दिलेल्या पर्यायाद्वारे JEE Advanced साठी नवीन पासवर्ड तयार करावा.

  4. त्यानंतर सर्व तपशीलांसह JEE Advanced 2021 अर्ज भरा.

  5. आता स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा.

  6. तद्नंतर अर्ज भरा आणि भविष्यातील वापरासाठी त्याचा प्रिंटआउट घ्या.

JEE Advanced 2021
स्टाफ नर्स भरती परीक्षेचे Admit Card जारी

महत्वाचे : JEE अर्जदारांना अर्जाच्या वेळी काही कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करावी लागतील. ही कागदपत्रे जेईई मेन 2020, 2021 पात्र उमेदवारांसाठी आणि जेईई मेन 2020 पात्र, परंतु अनुपस्थित उमेदवारांसाठी स्वतंत्रपणे समाविष्ट केली जातील. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) येथे विविध पदवीपूर्व अभियांत्रिकी, विज्ञान आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी JEE Advanced परीक्षा आयोजित केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com