
Agniveer Bharati : भारतीय वायुदलात अग्निविरांची भरती; अशी होणार तरुणांची निवड
मुंबई : भारतीय हवाई दलात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय वायुसेनेने कालपासून म्हणजेच १७ मार्च २०२३ पासून IAF अग्निवीर भरती २०२३ साठी नोंदणी सुरू केली आहे.
अधिकृत वेबसाइट www.agnipathvayu.cdac.in वर जाऊन उमेदवार ३१ मार्चपर्यंत अर्ज करू शकतील. अग्निवीर भारतीय वायुसेनेसाठी केवळ अविवाहित भारतीय पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. (Agniveer Bharati indian air force recruitment)
वयोमर्यादा २६ डिसेंबर २००२ ते २६ जून २००२ दरम्यान मोजली जाईल. त्याच वेळी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह इंटरमिजिएट केलेले असावे.
अग्निवीर वायुसेना भरतीसाठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यांच्या परीक्षेनंतर केली जाईल. टप्पा १ ही लेखी परीक्षा आहे, फेज २ ही शारीरिक कार्यक्षमता चाचणी आहे आणि टप्पा ३ ही वैद्यकीय परीक्षा आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटवर निवड प्रक्रियेशी संबंधित अधिक माहिती तपासू शकतात.
भारतीय हवाई दलाकडून कोणत्याही उमेदवाराचे परीक्षा केंद्र बदलले जाणार नाही किंवा परीक्षेची तारीख बदलली जाणार नाही. अशा परिस्थितीत, उमेदवारांना सूचना वाचल्यानंतरच अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अग्निवीर वायुसेनेसाठी अर्ज कसा करायचा ?
१. सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम www.agnipathvayu.cdac.in वर जावे.
२. त्यानंतर अग्निवीर एअर फोर्स रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करावे.
३. वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून सबमिट करा.
४. अग्निवीर भरतीसाठी संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
५. अग्निवीर एअर फोर्स फॉर्म फायनल सबमिट करा.
६. फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि भविष्यासाठी ती तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.