
ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनने (एआयएमए) एमएटी 2021 अंतर्गत पेपर बेस्ड टेस्ट (पीबीटी) साठी नोंदणीची अंतिम तारीख वाढविली आहे. आता उमेदवार 3 मार्च 2021 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात.
सोलापूर : ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनने (एआयएमए) एमएटी 2021 अंतर्गत पेपर बेस्ड टेस्ट (पीबीटी) साठी नोंदणीची अंतिम तारीख वाढविली आहे. आता उमेदवार 3 मार्च 2021 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात. यापूर्वी नोंदणीची अंतिम तारीख 1 मार्च 2021 होती. अशा परिस्थितीत ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी अधिकृत वेबसाइट, mat.aima.in वर जाऊन लवकरात लवकर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
अशी करा वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी
- पेपर बेस्ड ऑनलाइन टेस्टच्या नोंदणीसाठी उमेदवाराने प्रथम अधिकृत वेबसाइट mat.aima.in वर लॉग इन करावे.
- यानंतर मुख्य पेजवरील लॉग इन तयार करण्यासाठी "फ्रेश कॅंडिडेट टू क्रिएट लॉग इन'वर क्लिक करा.
- आता तुम्ही नवीन टॅबवर याल. येथे आपले नाव, जन्म तारीख, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर व पासवर्ड आदी भरून सबमिट करा.
- आता आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी व्हेरिफाय करा.
- त्यानंतर मागील पेजवर परत या आणि "कम्प्लिट रजिस्ट्रेशन प्रोसेस' लिंकवर क्लिक करा.
- येथे आपला ई-मेल आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
- आता आपला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा आणि अर्ज फी सबमिट करा.
- भरलेला अर्ज डाउनलोड करा, हार्ड कॉपी काढा आणि ती सुरक्षित ठेवा.
एमबीए / पीजीडीएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक ही परीक्षा
मॅनेजमेंट ऍप्टिट्यूड टेस्ट 2021 अंतर्गत 6 मार्च 2021 रोजी पेपर बेस्ड टेस्ट (पीबीटी) घेण्यात येणार आहे. टेस्टसाठी ऍडमिट कार्ड (प्रवेश पत्र) 3 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता देण्यात येईल. प्रवेशपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते डाउनलोड करू शकतील. उल्लेखनीय आहे, की एआयएमएद्वारा एमएटी 2021 ची संगणक आधारित चाचणी 20 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात आली. मॅनेजमेंट ऍप्टिट्यूड टेस्ट ही राष्ट्रीय स्तरावरील व्यवस्थापन प्रवेश परीक्षा आहे, जी 600 पेक्षा जास्त शाळांमध्ये एमबीए / पीजीडीएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते.