करिअर अपडेट : प्रभावी नेतृत्व

आजच्या युगात व्यवसायात यशस्वितेसाठी आवश्यक असणारा महत्त्वाचा गुण म्हणजे ‘नेतृत्व कौशल्य!’ नेतृत्व करताना कोणत्या प्रकारच्या शैलीचा समावेश असू शकते, ते पाहूयात.
Career
CareerSakal
Summary

आजच्या युगात व्यवसायात यशस्वितेसाठी आवश्यक असणारा महत्त्वाचा गुण म्हणजे ‘नेतृत्व कौशल्य!’ नेतृत्व करताना कोणत्या प्रकारच्या शैलीचा समावेश असू शकते, ते पाहूयात.

- अंकित भार्गव

आजच्या युगात व्यवसायात यशस्वितेसाठी आवश्यक असणारा महत्त्वाचा गुण म्हणजे ‘नेतृत्व कौशल्य!’ नेतृत्व करताना कोणत्या प्रकारच्या शैलीचा समावेश असू शकते, ते पाहूयात.

  • लोकशाहीला महत्त्व देणारे नेतृत्व - संस्था/कंपनीमध्ये कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास नेतृत्व करणारी व्यक्ती मीटिंग बोलवत असेल, ‘चला यावर चर्चा करूया’ असे म्हणत असल्यास अशा व्यक्तीमध्ये सर्वांना सोबत घ्यायची, लोकशाहीला महत्त्व देणारी नेतृत्वशैली आहे, असे म्हटले जाते. ही व्यक्ती जास्त लोकांच्या मतावर विश्वास ठेवणारी असते. टीममधील उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी अशा स्वरूपाचे नेतृत्व उत्तम आहे.

  • हिटलर इफेक्ट - एखाद्या कंपनी, संस्थेत नेतृत्व करणारी व्यक्ती ‘तुम्हाला सांगितले आहे ते करा’ असे सांगणारी असल्यास हे नेतृत्वकौशल्य ‘हिटलर इफेक्ट’ स्वरूपाचे असते. विचारप्रक्रियेबद्दल खात्री असते, आणि नेमकं काय हवे आहे? ते माहीत असते. असे नेतृत्व करणारी व्यक्ती प्रभावी आणि कार्यक्षमपणे संस्था चालवतात.

  • कोच कार्टर - ‘तुमच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी कॉफी घेऊया’ असे वाक्य कोच कार्टर स्वरूपाची नेतृत्वशैली असणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यात अनेकदा येते. ही व्यक्ती टीमला समजून घेण्यासाठी, त्यांच्या क्षमतांच्या आधारावर समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी वेळ काढतात. हे नेतृत्व टीमसाठी सशक्त असले असले तरी वेळखाऊ आहे.

  • द बुल डॉग - ‘मी स्वतः यावर काम करेन’ अशा स्वरूपाची नेतृत्व शैली ‘द बुल डॉग’ म्हणता येईल. अशी व्यक्ती गंभीर किंवा विशिष्ट कौशल्याची आवश्यकता असलेल्या समस्यांना सामोरे जातात. संस्थेसाठी महत्त्वाच्या कामांमध्ये गुणवत्ता, परिणामकारकता आणि कार्यक्षमता निश्चित करण्यासाठी असे नेतृत्व महत्त्वाचे ठरते.

  • कामाचे/जबाबदारीचे वाटप - ‘ते काम पूर्ण झाल्यावर मला कळवा’ अशा प्रकारे वागणारी व्यक्ती यामध्ये येते. एखादे कार्य कसे करावे, याबद्दल किमान मार्गदर्शन या शैलीचे नेतृत्व करणारी व्यक्ती देते. ही व्यक्ती टीममधील सदस्यांना समस्येला कसे सामोरे जायचे, ती कशी सोडवायची, हे स्वतःच शोधून देतात. टीममधील सदस्यांना स्वतंत्रपणे कार्य करण्याची परवानगी देत असते.

  • द पेससेटर्स - ‘हे कसे करायले हवे, ते मी तुम्हाला दाखवतो’ अशा प्रकारची नेतृत्वशैली यामध्ये येते. अशी व्यक्ती संस्था, कंपनीत एखाद्या समस्येचा सामना करावा लागतो, तेव्हा आघाडीवर असते. हे टीमच्या मनोबलासाठी उत्तम असले तरी, यामुळे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवर जास्त अवलंबून राहणे आणि टीममधील इतर सदस्यांमध्ये समस्या सोडविण्याच्या क्षमतेचा अभाव होऊ शकतो. अर्थात नेतृत्वाची कोणतीही चांगली एकल शैली नाही. कोणत्या परिस्थितीमध्ये कोणती शैली वापरायची आहे, हे ठरवता आले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com