जगभरातील विद्यापीठांचे QS ranking जाहीर; भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ कोणते ?

एकूण ४१ भारतीय विद्यापीठांनी QS क्रमवारीत स्थान मिळविले आहे, त्यापैकी १२ विद्यापीठांनी त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे,
QS ranking
QS ranking google

मुंबई : लंडन-आधारित जागतिक उच्च शिक्षण विश्लेषक क्वाक्वेरेली सायमंड्स (QS) यांनी जगातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे रँकिंग जारी केले आहे, ज्यामध्ये बंगळुरूस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) हे दक्षिण आशियातील सर्वात वेगाने वाढणारे विद्यापीठ आहे. IISc बंगलोर जगातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये १५५ व्या क्रमांकावर आहे. QS ने जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रमवारीत भारतातील चार IIT ने जगातील सर्वोत्कृष्ट २०० विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने QS रँकिंगच्या या यादीत पाच स्थानांनी झेप घेत १७२ व्या स्थानावर झेप घेतली आहे. IIT-मुंबईला भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम संस्था म्हणून मानांकन मिळाले आहे तर IIT-दिल्ली ११ स्थानांनी १७४ व्या स्थानावर पोहोचले आहे.

या क्रमवारीच्या इतिहासात आयआयटी-कानपूरने १३ स्थानांची प्रगती करत आपले सर्वकालीन सर्वोत्तम २६४ वे स्थान गाठले आहे. तर आयआयटी-रुरकीने ३१ स्थानांनी झेप घेत सर्वोच्च क्रमांक (३६९) गाठला आहे. या QS क्रमवारीत IIT-इंदूर ३९६ व्या क्रमांकावर आहे.

क्रमवारीनुसार, OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी हे सलग तिसर्‍या वर्षी QS च्या या यादीत सर्वोच्च स्थानावर असलेले खासगी विद्यापीठ आहे. एकूण ४१ भारतीय विद्यापीठांनी QS क्रमवारीत स्थान मिळविले आहे, त्यापैकी १२ विद्यापीठांनी त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे, १२ विद्यापीठांच्या च्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही, १० संस्थांची घसरण झाली आहे, तर देशातील सात विद्यापीठांनी या यादीत प्रथम स्थान मिळवले आहे.

क्रमवारीनुसार, १३ भारतीय विद्यापीठांनी इतर जागतिक स्पर्धकांच्या तुलनेत त्यांचा संशोधन प्रभाव सुधारला आहे. त्याच वेळी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामिया यांसारख्या देशातील आघाडीच्या विद्यापीठांच्या QS क्रमवारीत घसरण झाली आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला या वर्षीच्या QS क्रमवारीत ६०१ ते ६५० स्थानांच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे, जे मागील वेळी ५६१ ते ५७० स्थानांवर होते. या वर्षीच्या QS क्रमवारीत जामिया मिलिया इस्लामियाला ८०१ ते १००० क्रमांकावर ठेवण्यात आले आहे, तर मागील वेळी ते ७५१ ते ८०० श्रेणीत होते. याशिवाय जामिया हमदर्दला १२०१ या श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. याशिवाय हैदराबाद विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठ आणि आयआयटी-भुवनेश्वर यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com