esakal | एमएड, एमपीएड आणि बीपीएडच्‍या प्रवेशासाठी २६ पर्यंत अर्जाची मुदत
sakal

बोलून बातमी शोधा

online application

एमएड, एमपीएड आणि बीपीएडच्‍या प्रवेशासाठी २६ पर्यंत अर्जाची मुदत

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : शिक्षणशास्‍त्र शाखेच्‍या विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नुकताच पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासंदर्भात सूचनापत्र जारी केले आहे. त्‍यानुसार एम.एड., एमपी.एड., बीपी.एड. या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना २६ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करायचा आहेत. (application deadline for admission for med mped and bped is 26th Jul)

दोन वर्षे कालावधीच्‍या मास्‍टर ऑफ एज्‍युकेशन (एम.एड.) या पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्षास सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिला जाईल. या शिक्षणक्रमाच्‍या प्रवेशाकरीता बी.एड. झालेल्‍या विद्यार्थ्यांसह बीए-बी.एड./बी.एस्सी.बी.एड. (इंटिग्रेटेड), बी.ईएल.ईएड., डी.ईएल.ईएड. या शिक्षणक्रमांतून यशस्‍वीरीत्‍या उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र ठरतील. या अभ्यासक्रमाच्‍या सीईटी परीक्षेत वेगवेगळ्या पाच विषयांवर प्रत्‍येकी वीस या प्रमाणे शंभर गुणांसाठी शंभर वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्‍न विचारले जातील. पात्रतेच्‍या व परीक्षेसंबंधीच्‍या सर्व अटी-शर्ती व माहिती सूचनापत्रात उपलब्‍ध करून दिली आहे.

हेही वाचा: आर्मीत नोकरीची संधी! दहावी-बारावी विद्यार्थी करु शकतात अर्ज

शारीरिक शिक्षण शाखेशी निगडीत दोन वर्ष कालावधीच्‍या बी.पी.एड. शिक्षणक्रमाच्‍या प्रवेशाची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. किमान गुणांच्या अटीसह पदवी शिक्षण पूर्ण केलेले व शालेय-महाविद्यालयीन स्‍तरावर क्रीडा स्‍पर्धा, खेळात सहभाग असलेले विद्यार्थी या शिक्षणक्रमासाठी प्रवेशास पात्र आहेत. शारीरिक शिक्षण विषयासह पदवी शिक्षण पूर्ण केलेले, आंतरराष्ट्रीय स्‍पर्धेत सहभागी असलेले, पदवी शिक्षणानंतर शारीरिक शिक्षण किंवा प्रशिक्षक म्‍हणून तीन वर्षे नोकरी केलेले उमेदवारदेखील या शिक्षणक्रमाच्‍या प्रवेशासाठी पात्र ठरतील. सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून या शिक्षणक्रमास प्रवेश दिला जाईल.

पदव्‍युत्तर पदवी शिक्षणक्रम एम.पी.एड.च्‍याही प्रवेशासाठी सीईटी घेतली जाईल. बी.पी.एड. शिक्षणक्रमात उत्तीर्ण, आरोग्‍य आणि शारीरिक शिक्षण विषयातून बी.एस्सी. हे पदवी शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या सीईटी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी पात्रता व अन्‍य माहिती समजून घेण्याचे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

हेही वाचा: इन्कम टॅक्‍स डिपार्टमेंटमध्ये नोकरीची संधी! दरमहा 1.42 लाख रुपये पगार

अर्जासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

बारावीनंतर बीए.बी.एड./बी.एस्सी.बी.एड. असा चार वर्षे कालावधीच्‍या संयुक्‍त पदवी अभ्यासक्रमास सीईटी परीक्षेतून प्रवेश दिला जाणार आहे. या सीईटी परीक्षेच्‍या अर्जाची गेल्‍या ८ जुलैपर्यंत मुदत होती. मात्र ही मुदत सीईटी सेलने वाढविली आहे. त्‍यानुसार शुक्रवार (ता.१६) पर्यंत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकतील.

(application deadline for admission for med mped and bped is 26th Jul)

loading image