esakal | सर्वोच्च न्यायालयीन सहाय्यक पदांसाठी सुरू झाली अर्ज प्रक्रिया ! शेवटची तारीख 13 मार्च; असे करा ऑनलाइन अर्ज

बोलून बातमी शोधा

Suprime Court.

कोर्स असिस्टंट (ज्युनिअर ट्रान्सलेटर) च्या एकूण 30 जागांसाठी भरती अधिसूचना नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने 1 फेब्रुवारी रोजी जाहीर केली. सुप्रिम कोर्ट भरती 2021 च्या अधिसूचनेच्या वेळापत्रकानुसार सोमवारी (15 फेब्रुवारी) प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

सर्वोच्च न्यायालयीन सहाय्यक पदांसाठी सुरू झाली अर्ज प्रक्रिया ! शेवटची तारीख 13 मार्च; असे करा ऑनलाइन अर्ज

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोर्स असिस्टंट (ज्युनिअर ट्रान्सलेटर) च्या एकूण 30 जागांसाठी भरती अधिसूचना नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने 1 फेब्रुवारी रोजी जाहीर केली. सुप्रिम कोर्ट भरती 2021 च्या अधिसूचनेच्या वेळापत्रकानुसार सोमवारी (15 फेब्रुवारी) प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

इच्छुक उमेदवार सुप्रिम कोर्टाच्या अधिकृत भरती पोर्टल jobapply.in/Sc2020Translator वर प्रदान केलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेनुसार उमेदवारांना 13 मार्च 2021 रोजी रात्री 11.59 पर्यंत नोंदणी व अर्ज फी भरणे शक्‍य होईल. 

या पदांसाठी होईल भरती... 
अधिसूचनेनुसार सर्वोच्च न्यायालयाने घेतलेले निर्णय इंग्रजीमधून विविध प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी कोर्ट सहाय्यक (कनिष्ठ अनुवादक) या पदावर भरती करायच्या आहेत. भाषांनुसार रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे... 

 • कोर्स असिस्टंट (कनिष्ठ अनुवादक - इंग्रजी ते हिंदी) - 5 पदे. 
 • कोर्स असिस्टंट (कनिष्ठ अनुवादक - इंग्रजी ते आसामी) - 2 पदे 
 • कोर्स असिस्टंट (कनिष्ठ अनुवादक - इंग्रजी ते बंगाली) - 2 पदे 
 • कोर्स असिस्टंट (कनिष्ठ अनुवादक - इंग्रजी ते तेलुगू) - 2 पदे 
 • कोर्स असिस्टंट (कनिष्ठ अनुवादक - इंग्रजी ते गुजराती) - 2 पदे 
 • कोर्स असिस्टंट (कनिष्ठ अनुवादक - इंग्रजी ते उर्दू) - 2 पदे. 
 • कोर्स असिस्टंट (कनिष्ठ अनुवादक - इंग्रजी ते मराठी) - 2 पदे 
 • कोर्स असिस्टंट (कनिष्ठ अनुवादक - इंग्रजी ते तमिळ) - 2 पदे 
 • कोर्स असिस्टंट (कनिष्ठ अनुवादक - इंग्रजी ते कन्नड) - 2 पदे 
 • कोर्स असिस्टंट (कनिष्ठ अनुवादक - इंग्रजी ते मल्याळम) - 2 पदे 
 • कोर्स असिस्टंट (कनिष्ठ अनुवादक - इंग्रजी ते मणिपुरी) - 2 पदे 
 • कोर्स असिस्टंट (कनिष्ठ अनुवादक - इंग्रजी ते उडिया) - 2 पदे 
 • कोर्स असिस्टंट (कनिष्ठ अनुवादक - इंग्रजी ते पंजाबी) - 2 पदे 
 • कोर्स असिस्टंट (कनिष्ठ अनुवादक - इंग्रजी ते नेपाळी) - 1 पद 

या उमेदवारांना करता येईल अर्ज... 
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इंग्रजी व संबंधित प्रादेशिक भाषेसह इतर उच्च शिक्षण संस्थेतून पदवीधर असणे आवश्‍यक आहे. तसेच इंग्रजीमधून संबंधित भाषेत अनुवादात डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. प्रमाणपत्र नसताना भाषांतराचा दोन वर्षांचा अनुभव असावा.