तंत्रशिक्षण विभागांतर्गत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ परीक्षेसाठी १५ एप्रिलपर्यत करता येणार अर्ज

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष; परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी अर्ज स्वीकृती सुरू
Applications for CET examinations degree and postgraduate courses Department of Technical Education till 15th April pune
Applications for CET examinations degree and postgraduate courses Department of Technical Education till 15th April pune sakal

पुणे : राज्याच्या तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे ऑनलाइन अर्ज नोंदणी आता १५ एप्रिलपर्यंत करता येणार आहेत. तर उच्च शिक्षण विभागांतर्गत पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांसाठी १२ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येईल, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिली आहे.

परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आलेली आहे. अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांचे माहिती पुस्तिका, वेळापत्रक आणि अभ्यासक्रम परीक्षा कक्षाच्या ‘www.mahacet.org’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उच्च शिक्षण विभागांतर्गत विविध अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा ३ ते १० जून दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १९ मार्चपासून सुरू झाली असून १२ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

तंत्रशिक्षणांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी १० फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना आता १५ एप्रिलपर्यंत अर्ज नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठी ११ ते २८ जून या कालावधीत सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच कला शिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा १२ जून रोजी घेण्यात येणार आहे.

दरम्यान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी ११ ते २३ जून दरम्यान ‘एमएचटी सीईटी’ परीक्षा (संभाव्य कालावधी) होणार आहे. या अंतर्गत ‘पीसीएम’ हा ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा ११ ते १६ जून, तर ‘पीसीबी’ हा ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा १७ ते २३ जून या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे सीईटी सेलने यापूर्वी जाहीर केले आहे.

सीईटी’ परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक

अभ्यासक्रम : सीईटी परीक्षेचा संभाव्य कालावधी

  • बी.ई/बी.टेक : ११ ते २३ जून

  • एमबीए/एमएमएस : २४ ते २६ जून

  • एमसीए, बी. एचएमसीटी, एम.एचएमसीटी, एम.आर्च : २७ ते २८ जून

  • बीए-बी.एड, बी.एस्सी-बी.एड, बीपीएड, विधी (तीन वर्ष), बी.एड, बी.एड-एम.एड, एम. एड, एमपीएड, विधी (पाच वर्ष) : ३ ते १० जून

  • दृष्यकला पदवी व डिझाईन : १२ जून

विविध ‘सीईटी’ परीक्षांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

परीक्षेचे नाव : नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

  • एमएचटी-सीईटी : ५,०१,२८७

  • एमबीए/एमएमएस-सीईटी : ३६,७४३

  • एमसीए-सीईटी : १०,०००

  • एलएलबी (५वर्ष) -सीईटी : ८,५४६

  • एलएलबी (३वर्ष)- सीईटी : १४,६९१

  • एकूण सर्व पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ परीक्षा : ५,८७,५४४

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.mahacet.org

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com