Scholarship : शिष्यवृत्तीसाठी ३१ मार्चपुर्वी करा अर्ज

पदवी व पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ३१ मार्चपूर्वी अर्ज करावा, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
scholarship
scholarshipsakal
Summary

पदवी व पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ३१ मार्चपूर्वी अर्ज करावा, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे - पदवी व पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ३१ मार्चपूर्वी अर्ज करावा, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्रासह राज्य सरकारच्या वतीने उच्च शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्त्या जाहिर करण्यात आल्या आहे. महाडिबीटी पोर्टवर यासंबंधीचे अर्ज करता येतात.

विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी तातडीने अर्ज करावे असे सूचित करण्यात आले आहे. कारण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ७८ टक्केच विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे लक्षात आले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केली नसून, यामुळे ते योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांची जागृती करत अर्ज भरून घेणे व प्रंलंबित अर्ज निकाली काढावे, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

संकेतस्थळ - https://mahadbt.maharashtra.gov.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com