भविष्य नोकऱ्यांचे : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षण क्षेत्र

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 18 June 2020

आपण मागच्या लेखापासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) रोजच्या जीवनातील उपयोजनाविषयी बोलत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण देता येईल का, याचा ऊहापोह करूया. सर्वप्रथम शिक्षणामधील महत्त्वाचे घटक आहेत शिक्षक आणि विद्यार्थी.

आपण मागच्या लेखापासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) रोजच्या जीवनातील उपयोजनाविषयी बोलत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण देता येईल का, याचा ऊहापोह करूया. सर्वप्रथम शिक्षणामधील महत्त्वाचे घटक आहेत शिक्षक आणि विद्यार्थी. शिक्षक विद्यार्थ्यांना विविध संकल्पना उलगडून सांगतात. विद्यार्थ्यांनी त्या संकल्पना आत्मसात करणे अपेक्षित असते आणि त्या संकल्पनांचे आकलन विविध प्रकारच्या चाचण्या किंवा परीक्षेच्या माध्यमातून तपासल्या जातात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये विद्यार्थी शिक्षक प्रमाण नेहमीच व्यस्त राहिलेले आहे. अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग या कामासाठी किंवा शिक्षकांना पूरक म्हणून केला जाऊ शकतो. यामध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत
१) वैयक्तिकृत शिक्षण 
२) निरंतर मूल्यांकन 

वैयक्तिकृत शिक्षण पद्धतीमध्ये शिष्याच्या आवडीनुसार आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनुसार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक पार्श्‍वभूमी तपासणे अत्यंत आवश्यक असते. त्यानुसार विविध विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांच्यासाठी वैयक्तिकृत शिक्षण सामग्री तयार करण्यात येते. विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक पार्श्वभूमी चाचपण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण चाचणी तयार करू शकतो आणि त्याआधारे विद्यार्थी गट तयार करता येतात. याकामी कृत्रिम बुद्धिमत्तेमधील गट तयार करणाऱ्या तंत्राचा वापर केला जातो. त्याला तांत्रिक भाषेत क्लस्टरिंग म्हणतात. यातील प्रत्येक गटाला क्षमतेनुसार संकल्पना शिकवल्या जाऊ शकतात.  

वैयक्तिकृत पद्धतीमध्ये आपल्याला शिष्यांचे निरंतर मूल्यांकन करावे लागते. यासाठी आपण दृक-श्राव्य माहिती संकलन करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्याचे पृथ्थकरण करता येते. एखाद्या प्रश्नाचे उत्तर संबंधित विद्यार्थी किती आत्मविश्‍वासाने देतो याचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मूल्यांकन करता येते किंवा एखादी संकल्पना किती समजली हे चेहऱ्याच्या हावभावावरून ताडता येते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून अशा प्रणाली तयार करणे सहज शक्य आहे. यासाठी दृकश्राव्य प्रारूपांचा वापर केला जातो. याच तंत्रांचा अलीकडच्या काळामध्ये संगणकाने मानवापेक्षा सर्रास दृष्टी प्राप्त केली आहे. अशा विविध मार्गाने मूल्यांकन करून आपल्याला संकल्पनांचे आकलन तपासात येते. कृत्रिम बुद्धिमत्तेप्रणित मूल्यांकन पद्धती विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय पार पाडता येते. या कामी विद्यार्थ्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीसोबतच्या संवादाचा आधार घेतला जातो. आपल्यापैकी काही जणांना खान अकादमीविषयी (http://www.khanacademy.org) माहीत असेल. तेथे या लेखामध्ये उल्लेख केलेल्या काही बाबींचा वापर केला जातो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ashish tendulkar on Artificial intelligence and education sector