भविष्य नोकऱ्यांचे : डोमेन एक्स्पर्टच्या कामाविषयी...

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 13 February 2020

आपण मागील भागात माहिती संकलनामधील व्यवसाय संधींबद्दल विवेचन केले. संकलित माहितीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी लागणारे तालीम संच तयार करण्यात येतात. याच तालीम संचामधून आपण संगणकाला एखाद्या कामात तरबेज करण्याचा प्रयत्न करतो. या कामाचे अनेक टप्पे असतात आणि त्यासाठी अतिशय कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. साधारणतः संगणक तज्ज्ञ, आज्ञावलीकार, सांख्यिकी आणि गणितज्ञ यांना या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. 

आपण मागील भागात माहिती संकलनामधील व्यवसाय संधींबद्दल विवेचन केले. संकलित माहितीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी लागणारे तालीम संच तयार करण्यात येतात. याच तालीम संचामधून आपण संगणकाला एखाद्या कामात तरबेज करण्याचा प्रयत्न करतो. या कामाचे अनेक टप्पे असतात आणि त्यासाठी अतिशय कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. साधारणतः संगणक तज्ज्ञ, आज्ञावलीकार, सांख्यिकी आणि गणितज्ञ यांना या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्वप्रथम आपल्यासमोरील प्रश्‍न कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून सोडविता येईल का, हे तपासून पाहावे लागते. सर्वसाधारपणे असे प्रश्‍न प्रशिक्षित कामगार चुटकीसरशी सोडवू शकतात, पण त्यांना हे प्रश्‍न सोडविण्याची माहिती पद्धतशीरपणे मांडता येत नाही. उदा. आपण सर्वच जण एखाद्या छायाचित्रांमधून मानवी चेहरे सहज ओळखू शकतो-अगदी वेगवेगळ्या कोनातून काढलेल्या छायाचित्रांमधूनही. मात्र आपण हे कसे सध्या करतो हे आपल्याला पद्धतशीरपणे मांडता येत नाही. या अडचणीमुळे आपण अशा कामांसाठी प्रभावी संगणक आज्ञावली फारच आव्हानात्मक बनते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून असे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. 

हीच पद्धत वापरून आपण त्रुटी असलेले यांत्रिक भाग वेचून वेगळे करू शकतो किंवा दोन स्थानांतील प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेचा अचूक अंदाज बांधू शकतो. याच तंत्राने एखादा कर्जदार कर्जाची परतफेड करेल किंवा नाही, याचाही अंदाज बांधता येतो. असे प्रश्‍न हेरण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संबंधित व्यवसायातील तज्ज्ञ एकत्र येऊन काम करतात. व्यवसाय तज्ज्ञांना त्यांच्या क्षेत्राची सखोल माहिती असते आणि याच अनुषंगाने ठरावीक प्रश्‍नांची उकल कशी करावी, याची योग्य समज असते. म्हणूनच एखादा प्रश्‍न कृत्रिम बुद्धिमत्तेकरवी उकल करण्यायोग्य आहे का, हे तपासण्यासाठी या तज्ज्ञाची मोलाची मदत होते. त्यानंतर योग्य प्रश्‍नांसाठी तालीम संचाच्या उपलब्धतेविषयी हेच तज्ज्ञ मार्गदर्शन करू शकतात.

साधारणतः व्यावसायिक माहिती वेगवेगळ्या माहिती कुंभामध्ये साठविलेली असते. या माहिती कुंभांविषयी माहिती याच अधिकाऱ्यांकडून प्राप्त केली जाते. या माहितीच्या आधारे मग आपण तालीम संच तयार करतो. तालीम संचामध्ये प्रत्येक उदाहरण, त्याची वैशिष्ट्ये आणि शिक्का या स्वरूपात मांडावी लागतात. विविध वैशिष्ट्यांचा शिक्क्याशी काही संबंध आहे का आणि अशी संबंधित वैशिष्ट्ये कशी शोधून काढावी, हेही आपल्याला व्यवसाय तज्ज्ञांकडून समजून घ्यावे लागते. व्यवसायाशी संबंधित तज्ज्ञ मंडळी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे एखादी गोष्ट सध्या करण्यात फारच मोलाची भूमिका बजावत असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr ashish tendulkar on domain expert work