भविष्य नोकऱ्यांचे - कोरोना विषाणू आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 2 April 2020

कोणती माहिती टिपायची हे आपल्याला आधी ठरवावे लागेल. 

  • साधारणपणे रुग्णाला एक सूचक क्रमांक द्यावा लागेल 
  • कोरोना विषाणूचा संसर्ग कुठे झाला (शहर/देश)
  • संसर्ग कुठे आढळून आला (शहर/देश)
  • रुग्णाचा पत्ता (गाव/शहर/राज्य/देश) 
  • सद्यःस्थिती ही माहिती गोळा करावी लागेल.

कोरोना विषाणू आजच्या घडीला समस्त मानवासाठी सर्वांत मोठे आव्हान आहे. आत्तापर्यंत आपण कृत्रिम बुद्धिमत्ता, साधन शिक्षण, माहिती संकलन, पृथ्थ:करण या बद्दल वाचले आहे. या सर्व गोष्टी आपण कोरोनाशी लढण्यासाठी वापर करू शकतो का, याचा या लेखात ऊहापोह करूया.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपल्याला कोरोना विषाणूचा महाराष्ट्रातील फैलाव कसा होतोय याचा अभ्यास कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून करायचा आहे. पूर्वीच्या लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे माहिती किंवा विदा हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा गाभा आहे. सुरुवातीला आपण कोरोना रुग्णांविषयीची माहिती कशी गोळा करता येईल ते पाहूया. फैलावाविषयी अभ्यासासाठी आपल्याला आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांची माहिती गोळा करावी लागेल. ती आपल्याला ‘सकाळ’सारख्या वर्तमानपत्रातील बातम्यांमधून गोळा करता येईल. ही प्रक्रिया सुलभ ठेवण्यासाठी आपण ही गोष्ट मानवाच्या माध्यमातून करूया. म्हणजेच आपण बातमी वाचायची आणि त्यातील रुग्णाविषयीची माहिती टिपून ठेवायची.

Image may contain: text

आता हे आपण मनुष्यबळाच्या माध्यमातून करणार असल्यामुळे येथे आपणास संगणक आज्ञावली लिहिण्याची गरज नाही आणि कोणताही सामान्य माणूस ही गोष्ट करू शकतो. याबरोबर आपण सरकारी पातळीवरील विविध उपाय आणि त्याचा विषाणू फैलावावर होणार परिणाम अभ्यासू शकतो. यासाठी आपल्याला तारीखवार सरकारी पातळीवरील उपाययोजनांची नोंद करावी लागेल. ही माहिती वर्तमानपत्रामध्ये किंवा सरकारी संकेतस्थळांवरून सहजपणे काढता येऊ शकेल. टिपलेली माहिती आपण संगणकामध्ये गुगल शीटमध्ये अगदी मोफत साठवून ठेवू शकतो. मग करायची सुरवात माहिती संकलनाला! हा सर्व तपशील https://www.covid19india.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या माहितीपासून काय करता येईल त्याचा आढावा घेऊ. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला मार्च ९ या दिवशी पुण्यामध्ये. आजमितीला राज्यात एकूण रुग्ण हे शोधूया : राज्यातील रुग्णाची संख्या ३२५ पर्यंत आहे. आतापर्यंत हे रुग्ण महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. त्यानंतर जिल्हानिहाय रुग्ण संख्या काढूया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr ashish tendulkar on future jobs