भविष्य नोकऱ्यांचे : कृत्रिम बुद्धिमत्तेचे अंतरंग

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 13 August 2020

आपल्याला एखाद्या माहितीवरून दुसरी माहिती ताडण्यासाठी आणि विशेषतः ही ताडण्यासाठीची माहिती अंकाच्या स्वरूपातील असल्यास आपण रेषीय प्रतिगमा या तंत्रांचा वापर करतो. उदाहरणार्थ आपल्याला घराच्या क्षेत्रफळावरून किमतीचा अंदाज बांधायचा असल्यास या तंत्रांचा वापर करता येऊ शकेल. खालील कोष्टकामध्ये क्षेत्रफळावरून किंमत कशी काढायची याचा आराखडा काढला आहे.

आपण आजच्या लेखामध्ये चर्चा करणार आहोत रेषीय प्रतिगमन या तंत्राची. कृत्रिम बुद्धिमत्तेमधील हे एक अतिशय मूलभूत स्वरूपाचे तंत्र आहे.

आपल्याला एखाद्या माहितीवरून दुसरी माहिती ताडण्यासाठी आणि विशेषतः ही ताडण्यासाठीची माहिती अंकाच्या स्वरूपातील असल्यास आपण रेषीय प्रतिगमा या तंत्रांचा वापर करतो. उदाहरणार्थ आपल्याला घराच्या क्षेत्रफळावरून किमतीचा अंदाज बांधायचा असल्यास या तंत्रांचा वापर करता येऊ शकेल. खालील कोष्टकामध्ये क्षेत्रफळावरून किंमत कशी काढायची याचा आराखडा काढला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

थोडक्यात, या कामासाठी आपण, किंमत = अ x क्षेत्रफळ + ब,  अशा स्वरूपाचे समीकरण मांडले आहे. येथे ‘अ’ आणि ‘ब’ ही माहीत नसलेली पदे आहेत. येथे मला मुद्दामहून नमूद करावेसे वाटते की, हे समीकरण रेषेच्या समीकरणासारखे (y = mx + c) आहे. आपल्या समीकरणामध्ये y म्हणजे किंमत, x म्हणजे क्षेत्रफळ आणि m आणि c हे अनुक्रमे ‘अ’ आणि ‘ब’ आहेत. या समीकरणाला तांत्रिक भाषेत प्रारूप किंवा मॉडेल, असे संबोधले जाते. रेषेच्या समीकरणाप्रमाणे आपल्याला पदांच्या जागी नेमक्या कोणत्या संख्या आहेत याची माहिती नाही आणि या पदांची उकल करणे हा ‘एआय’मधील कळीचा मुद्दा आहे. या कामी आपल्याला तालीम संचांची मोलाची मदत होते. तालीम संचामध्ये आपल्याला कामासंदर्भात भरपूर उदाहरणे दिली जातात. या उदाहरणामध्ये आपला तालीम संच खालीलप्रमाणे दिसेल. मी येथे वानगीदाखल फक्त पाचच उदाहरणे दाखवली आहेत. प्रत्यक्षात या उदाहरणांची संख्या काही शेकड्यांमध्ये किंवा हजारांमध्ये असते.

Image may contain: text that says "क्षेत्रफळ किंमत (लाखांत) १००० ५५ ८०० ४२ १२०० ६० २००० १०० ६०० ३५"

या उदाहरणांवरून आपल्याला ‘अ’  आणि ‘ब’ या दोन पदांची उकल करायची आहे. त्यासाठी आपल्याला ऑप्टिमिझेशन या तंत्राचा वापर करावा लागेल. थोडक्यात सांगायचे तर, आपल्याला असे ‘अ’ आणि ‘ब’ शोधायचे आहेत, ज्यांच्यामुळे आपण काढलेली किंमत प्रत्यक्ष किमतीच्या जवळ असेल. 

हेच विधान गणितीय भाषेत ‘लॉस फंक्शन’ नावाने ओळखले जाते. आपण अनेक ‘अ’ आणि ‘ब’च्या किमती वापरून काढलेल्या आणि प्रत्यक्ष किमतीतील तफावत काढून, कमीत कमी तफावत देणारे ‘अ’ आणि ‘ब’ शोधून काढू शकतो, 

मात्र ही प्रक्रिया वेळकाढू आहे. अधिक  कार्यक्षमतेने ‘अ’ आणि ‘ब’ची उकल करण्यासाठी लॉस फंक्शनवर ऑप्टिमिझेशन तंत्राचा वापर केला जातो. पुढील लेखात लॉस फंक्शन आणि ऑप्टिमिझेशन तंत्राबाबत विस्ताराने बोलूया. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr ashish tendulkar on future jobs

Tags
टॉपिकस
Topic Tags: