भविष्य नोकऱ्यांचे : दैनंदिन जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 25 June 2020

आपण आज आपल्या घरातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोजन पाहणार आहोत. गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये चढ्या वीज देयकांसंदर्भातील बातम्या येत आहेत. ग्राहकांचे म्हणणे असे की, महावितरणने आम्हाला चढी देयके पाठवली आहेत, तर महावितरणच्या म्हणण्यानुसार देयके अचूक आहेत. हा धागा पकडून आपण आज आपल्या घरातील वीज/पाणी किंवा इतर तत्सम गोष्टींच्या वापरासंबंधी अंदाज बांधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर केला जाऊ शकतो याचा विचार करूया. 

आपण आज आपल्या घरातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोजन पाहणार आहोत. गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये चढ्या वीज देयकांसंदर्भातील बातम्या येत आहेत. ग्राहकांचे म्हणणे असे की, महावितरणने आम्हाला चढी देयके पाठवली आहेत, तर महावितरणच्या म्हणण्यानुसार देयके अचूक आहेत. हा धागा पकडून आपण आज आपल्या घरातील वीज/पाणी किंवा इतर तत्सम गोष्टींच्या वापरासंबंधी अंदाज बांधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर केला जाऊ शकतो याचा विचार करूया. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रथम आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने नेमका प्रश्‍न मांडणे आवश्यक आहे. आपल्या घरातील वीज किंवा पाणी वापराचा अंदाज आपल्याला मागील वापरावरून मांडायचा आहे. हाच प्रश्‍न आपण इतर गोष्टींच्या बाबतीतही मांडू शकतो. उदा. येत्या महिन्यात किती तांदूळ लागेल किंवा किती तूरडाळ लागेल. आपण सर्वच आपल्यापरीने या बाबतीत अंदाज बांधत असतो. येथे आपण तेच अंदाज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रारूपांचा वापर करून अधिक अचूकतेने वर्तवू शकतो. हे अंदाज आपल्याला कोणत्या पातळीवर मांडायचे याचा प्रथम विचार करावा लागेल- घरासाठी हा अंदाज मासिक असू शकतो, तर उपाहारगृहांसाठी तो आठवड्यासाठी! आता सर्वप्रथम आपल्याला मागील वापर उपलब्ध होणे गरजेचे आहे, त्याविना प्रारूपे मांडणे अशक्य आहे. आपल्याला लक्षात असेल ‘विना विदा नाही कृत्रिम प्रज्ञा.’ ज्या वेळेच्या पातळीवर हा अंदाज बांधायचा आहे, त्या पातळीवरील पूर्व वापराची माहिती उपलब्ध असणे अनिवार्य आहे. अशी माहिती उपलब्ध नसेल, तर ती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागते. अर्थातच अशा वेळी प्रारूपाची मांडणी लांबणीवर पडते. माहिती गोळा केल्यावर तिचे दृश्य अवलोकन अनेक गोष्टींवर प्रकाश टाकते. येथे एक वीज वापराचा नमुना दृश्य आलेख दिला आहे.

No photo description available.

वरील आलेखाचे अवलोकन केल्यास विजेचा वापर महिन्यानुसार बदलताना दिसतो. काही महिन्यांत तो जास्त आहे, तर काहीत कमी. म्हणजेच वीज वापरात विविधता आहे आणि त्यामुळे हा प्रश्‍न कृत्रिम बुद्धिमत्ततील प्रारूपांच्याद्वारे सोडविणे एक रंजक काम आहे. हाच आलेख सपाट असता आणि वापर एकसारखा असता, तर निव्वळ आलेख पाहून आपल्याला वीज वापराचा अंदाज बांधता आला असता आणि अशावेळी अंदाज वर्तविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रारूपांची गरज नाही. पुढील लेखामध्ये अशा प्रकारच्या वेळसंगत सारण्यांसाठी (time series) भविष्यातील अंदाज वर्तविणाऱ्या तंत्राविषयी बोलूया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr ashish tendulkar on job future

Tags
टॉपिकस
Topic Tags: