संधी नोकरीच्या : डिजिटल तंत्रज्ञान खुणावतेय

डॉ. शीतलकुमार रवंदळे
Thursday, 18 June 2020

भारतात आगामी काळात खूप मोठ्या प्रमाणावर डिजिटल कौशल्ये आत्मसात असणाऱ्या लोकांची गरज भासणार आहे. सुमारे ६.८० लाख डिजिटल कौशल्ये असणाऱ्या लोकांची आताच आपल्या देशाला गरज आहे. ही कौशल्ये असणाऱ्या मनुष्यबळाची दरवर्षी सुमारे २० टक्क्यांने वाढ होत आहे.

भारतात आगामी काळात खूप मोठ्या प्रमाणावर डिजिटल कौशल्ये आत्मसात असणाऱ्या लोकांची गरज भासणार आहे. सुमारे ६.८० लाख डिजिटल कौशल्ये असणाऱ्या लोकांची आताच आपल्या देशाला गरज आहे. ही कौशल्ये असणाऱ्या मनुष्यबळाची दरवर्षी सुमारे २० टक्क्यांने वाढ होत आहे. मात्र दरवर्षी ही कौशल्ये असणाऱ्या लोकांची गरज ३० टक्क्यांने वाढत आहे. त्यामुळे डिजिटल कौशल्ये असणाऱ्या लोकांची गरज ही उपलब्ध मनुष्यबळापेक्षा अधिक असणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतामध्ये गेल्या काही वर्षात सुमारे २.६ कोटी लोक शेती क्षेत्रातून इतर क्षेत्रात नोकरीसाठी गेले. प्रत्येक वर्षाला भारतातील सुमारे १.६ कोटी लोकांची काम करणाऱ्या वयोगटात वाढ होते. 

No photo description available.

उपलब्ध असलेल्या सुमारे ७.५ कोटी नोकऱ्या ऑटोमेशनमुळे विस्थापित होतील. मात्र त्याचवेळी नवीन १३.३ कोटी नोकऱ्या निर्माण होतील.

No photo description available.

गार्टनरच्या सर्वेनुसार
अ) डिजिटल टेक्नॉलॉजी क्षेत्रातील नोकऱ्यांपैकी ३० टक्के नोकऱ्या रिकाम्या राहतील व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मिळणार नाही.
ब) पुढील तीन वर्षात सायबर सिक्युरिटी क्षेत्रात ३० लाखांवर नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे.
क) आयओटी क्षेत्रात १.२ लाख मनुष्यबळाची गरज लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shitalkumar ravandale on Digital technology marks

Tags
टॉपिकस
Topic Tags: