संधी नोकरीच्या : कॅम्पस प्लेसमेंटसाठी महाविद्यालय निवडताना....

डॉ. शीतलकुमार रवंदळे
Thursday, 11 June 2020

शिक्षण कशासाठी, तर चांगली नोकरी मिळवून करिअर घडविण्यासाठी ही विद्यार्थ्यांची व पालकांची माफक अपेक्षा असते. कॅम्पस प्लेसमेंटमधून चांगल्या प्रकारची नोकरी मिळविण्यासाठी चांगले महाविद्यालय निवडणे महत्त्वाचे असते.

शिक्षण कशासाठी, तर चांगली नोकरी मिळवून करिअर घडविण्यासाठी ही विद्यार्थ्यांची व पालकांची माफक अपेक्षा असते. कॅम्पस प्लेसमेंटमधून चांगल्या प्रकारची नोकरी मिळविण्यासाठी चांगले महाविद्यालय निवडणे महत्त्वाचे असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती - अभियांत्रिकी, डिप्लोमा, आर्किटेक्चर, एमबीए, फार्मसी यांसारख्या कोर्सेससाठी महाराष्ट्र शासन शिष्यवृत्तीच्या स्वरूपात प्रमाणावर मदत करते. या कोर्सेसच्या अनेक विद्यार्थ्यांना ओबीसी, इबीसी, एससी, एसटी, एनटी, TFWS यांसारख्या अनेक शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते.

Image may contain: 1 person, sitting

महाविद्यालय निवडतानाची खबरदारी -
महाविद्यालयाचे प्लेसमेंट

महाविद्यालयाच्या कॅम्पस प्लेसमेंटचा आढावा महाविद्यालयाच्या वेबसाइटवर मिळू शकतो. गेल्या दोन वर्षांत कोणत्या कंपन्यांनी महाविद्यालयांच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभाग नोंदवला याची माहिती जाणून घ्या. प्लेसमेंट चांगले असलेल्या महाविद्यालयांचा कटऑफ निश्‍चितच जास्त असणार.

No photo description available.

1) गेल्या वर्षाचे कटऑफ मार्क्स : महाविद्यालयाची निवड करताना गेल्या वर्षाचे कटऑफ मार्क्स DTE च्या वेबसाइट वर बघावेत. 

2) महाविद्यालयाचे शैक्षणिक वातावरण : महाविद्यालयाचे शैक्षणिक वातावरण असल्याच त्याचा चांगला परिणाम प्लेसमेंटवर होतो. कॅम्पसमधील वातावरण शैक्षणिकदृष्ट्या कसे आहे, याची माहिती घ्यावी.                        

3) विद्यार्थी-प्राध्यापक प्रमाण : सर्व महाविद्यालयांना आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी चांगल्या प्राध्यापकांची गरज असते. आपण प्रवेश घेत आहात त्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांबद्दल जास्तीत जास्त माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे. पीएचडी पूर्ण असलेल्या प्राध्यापकांची संख्या, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक यांचे प्रमाण पाहावे.

4) महाविद्यालयाचे रँकिंग : भारत सरकारतर्फे नॅशनल इन्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) रँकिंग उच्चशिक्षणातील महाविद्यालयांना दिले जाते. याला चांगली मान्यता प्राप्त असते. त्याचप्रमाणे खासगी संस्थांतर्फेही महाविद्यालयांना रँकिंग दिले जाते. तुम्ही निवडत असलेले महाविद्यालय व त्यातील कोर्सेसला AICTE, DTE, सरकारी विद्यापीठे यांसारख्या सरकारी संस्थांची मान्यता आहे, का हेही तपासावे. 

5) कॅम्पसमधील पायाभूत सुविधा : महाविद्यालयामधील प्रयोगशाळा, ग्रंथालय, इमारती, संगणकांची संख्या, व्यायामशाळा व इतर सर्व सुविधा आहेत की नाही ते तपासावे.            

6) आजी/माजी विद्यार्थ्याचे अनुभव : आजी व माजी विद्यार्थ्यांशी बोलून संबंधित महाविद्यालयाविषयी वास्तविक माहिती मिळू शकते.

7) संशोधन क्षेत्रातील महाविद्यालयाचे कार्य : तुम्ही निवडत असणाऱ्या महाविद्यालयाने गेल्या काही वर्षांमध्ये किती पेटंट, कॉपीराइट फाईल केले आहेत का, याची माहिती घ्यावी. 

8) महाविद्यालयातील उपक्रम : ॲप्टिट्यूड, संवाद, प्रोग्रामिंग व तांत्रिक कौशल्ये वाढवण्यासाठी व प्रोजेक्ट आधारित शिक्षणासाठी महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणारे प्रथम वर्षांपासून  अंतिम वर्षापर्यंतचे उपक्रम पाहावे. 

9) शैक्षणिक समूह : उत्तम गुणवत्तेचे प्लेसमेंट व शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक समूहातील सर्वच महाविद्यालयात चांगली गुणवत्ता राखली जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shitalkumar ravandale on job chance