संधी नोकरीच्या : प्लेसमेंट, महाविद्यालये व उद्योगजगत समन्वय

डॉ. शीतलकुमार रवंदळे
Thursday, 9 July 2020

कोणत्याही महाविद्यालयात प्लेसमेंटची टक्केवारी वाढण्यासाठी त्या महाविद्यालयाचा विविध कंपन्यांशी असलेला समन्वय (Industry Institute Interaction ) महत्त्वाचा असतो.

भारतात महाविद्यालये व कंपन्यांतील संवाद मोठ्या प्रमाणावर वाढण्याची आवश्यकता आहे. भारत सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालय व ‘पीसीआय’च्या सर्वेक्षणानुसार भारताचा स्कोअर या क्षेत्रात १० पैकी ४.७ आहे. तो वाढविण्यासाठी विविध राज्यांतर्फे प्रयत्न केले जातात.

कोणत्याही महाविद्यालयात प्लेसमेंटची टक्केवारी वाढण्यासाठी त्या महाविद्यालयाचा विविध कंपन्यांशी असलेला समन्वय (Industry Institute Interaction ) महत्त्वाचा असतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतात महाविद्यालये व कंपन्यांतील संवाद मोठ्या प्रमाणावर वाढण्याची आवश्यकता आहे. भारत सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालय व ‘पीसीआय’च्या सर्वेक्षणानुसार भारताचा स्कोअर या क्षेत्रात १० पैकी ४.७ आहे. तो वाढविण्यासाठी विविध राज्यांतर्फे प्रयत्न केले जातात.

याव्यतिरिक्त महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा कंपन्यांतील सीएसआर उपक्रमांमध्ये चांगला सहभाग केला जाऊ शकतो. एकत्रितपणे एखादे गाव वा शहरातील एखादा परिसर दत्तक घेऊन तेथील लोकांचे /मुलांचे संगणक शिक्षण, साक्षरता, परिसराची स्वच्छता यांसारख्या बाबींवर चांगले काम करता येऊ शकते.

उद्योग जगत व महाविद्यालये यांतील समन्वयाचे फायदे
इंडस्ट्रीसाठी फायदे

 • उद्योगतज्ञांना अभ्यासक्रमाच्या डिझाइनमध्ये भाग घेण्याची संधी. 
 • तंत्रज्ञानातील शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये उद्योग सहभागी होऊ शकतात. 
 • तयार मनुष्यबळ भेटते आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात वेळ वाया जात नाही.  
 • त्यांच्या गरजेनुसार आवश्यक कौशल्ये असणारे विद्यार्थी तयार करण्याची संधी 

महाविद्यालयासाठी फायदे

 • कंपनीची गरज ओळखून अभ्यासक्रम तयार करता येतो व चांगले विद्यार्थी घडविता येतात 
 • विद्यार्थी व शिक्षकांसाठी औद्योगिक प्रशिक्षण  
 • कंपनीमधील ट्रेंडनुसार रोजगारांची संधी 
 • अनुसंधान आणि विकास, तपासणी यांच्या माध्यमातून निधी आकर्षित करण्याची संधी.

विद्यार्थ्यांसाठी फायदे

 • नोकरीची संधी 
 • उद्योगातील समस्यांवर काम करण्याचा अनुभव 
 • औद्योगिक कल्चर समजून घेण्याची संधी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shitalkumar ravandale on job chance