संधी नोकरीच्या : प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीत नोकरीसाठी

डॉ. शीतलकुमार रवंदळे
Thursday, 2 July 2020

सॉफ्टवेअर क्षेत्रात स्वतःचे आयटी प्रॉडक्ट्स बनविणाऱ्या कंपन्यांत नोकरी मिळणे तरुणांचे स्वप्न असते. गलेलठ्ठ पगाराबरोबरच अशा कंपन्यांत नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी व त्यावर काम करण्यासाठी वाव असतो. 

सॉफ्टवेअर क्षेत्रात स्वतःचे आयटी प्रॉडक्ट्स बनविणाऱ्या कंपन्यांत नोकरी मिळणे तरुणांचे स्वप्न असते. गलेलठ्ठ पगाराबरोबरच अशा कंपन्यांत नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी व त्यावर काम करण्यासाठी वाव असतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेकबुक, अमेझॉन यांसारख्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीत नोकरी मिळविणे हे एक मोठे स्वप्नच असते. त्याचबरोबर मध्यम वा कमी प्रसिद्ध असलेल्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपन्यांत संधी मिळाल्यास उत्तम करिअर घडते.

Image may contain: text that says "प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीत अनुभवानुसार मिळणारे साधारण वार्षिक वेतन: अनुभव (वर्षे) वार्षिक पगार (लाख रुपयांत) नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक गोष्टी: १ वर्षापेक्षा कमी ते७ १ते४ ५ते९ ते१० 2 १०ते १५ ०ते१९ Problem Solving Skills Sound Knowledge of Core Fundamental Concepts/Subject Passion for coding २० १८ते २० २० पेक्षा जास्त 3 २० पेक्षा अधिक Attitude"

तरुणांनी काय करावे?

 • ‘C’ सारखी एखादी language उत्तम प्रकारे यायला हवी.
 • Structures, Pointers, Arrays, Linked List, Trees, Graphs व Functions यावर चांगले प्रभुत्व असावे. 
 • Linux सारख्या ओपन सोर्स प्रोजेक्टसवर काम केलेले असावे. 
 • ओपन सोर्स प्रोजेक्टमधील अभ्यास करून एखाद्या तरी Bug वर Patch शोधायला हवे. 
 • ओपन सोर्स प्रोजेक्ट्समध्ये स्वतःचे काहीतरी योगदान असले पाहिजे. 
 • दुसऱ्या व तिसऱ्या वर्षात IIT/IISC सारख्या महाविद्यालयातील समर स्कुलमध्ये २-३ महिने तरी भाग घ्यायला हवा. अशा महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या ऑनलाइन संपर्कात राहून त्यांच्याबरोबर काही प्रोजेक्टवर काम करायला हवे. 
 • Google Summer of Code मध्ये एखादा प्रॉब्लेम सोडवून प्रमाणपत्र मिळवायला हवे. 
 • भविष्यात नोकरी देणाऱ्या एखाद्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीत इंटर्नशिप करावी. 
 • ACM - ICPC, Hackerrank, Codechef, Topcoder यासारख्या स्पर्धांमध्ये चांगली तयारी करून भाग घ्यावा. 
 • MultiThreading , Computer Architecture, Networking यासारख्या विषयांमध्ये प्राविण्य असावे. 
 • एखादा Computer Game,  Mobile App बनवायला हवा किंवा स्वतः संपूर्ण वेबसाइट बनवायला हवी. 
 • विविध Problem Statements शोधून त्यावर नियमित काम करायला हवे. 
 • Hackathon मध्ये नियमित भाग घ्यायला हवा. 
 • GATE परीक्षेचा उत्तम स्कोअर हवा. 
 • Integrated Development Environment (IDE ), Version Control concept व Git, SVN यासारख्या टुल्सची चांगली ओळख असावी.
 • Databases, Operating  Systems तसेच Unit Testing/Integration Testing/System Testing चे चांगले ज्ञान असावे. 
 • Cross-Platform तसेच Encryption व Software Development Life Cycle (SDLC) चे देखील ज्ञान असावे.
 • Searching, Sorting Algorithms चा चांगला अभ्यास हवा. विस्तृत माहिती https://www.geeksforgeeks.org/fundamentals-of-algorithms/ या लिंक वर मिळेल. 
 • Data Structure चा चांगला अभ्यास हवा. विस्तृत माहिती https://www.geeksforgeeks.org/data-structures/ या लिंकवर मिळेल.

Image may contain: text that says "कोणाला प्राधान्य 1 Understand the Proble lem 5 2 Analyzeit Analyze Complexity 6 3 Propose Data Structure Design Solution 4 Write Algorithm for Solution Find the Bug after Testing Give Solution/Patch for the Bug 8"

विद्यार्थ्यांनी तयारी कधी करावी?
आयटी सर्व्हिसेस कंपन्यांमध्ये ॲप्टीट्युडवर भर दिला जातो. त्यामुळे अशा कंपन्यांसाठी विद्यार्थ्याने तिसऱ्या वर्षापासून तयारी केली तरी चालू शकते, परंतु आयटी प्रॉडक्ट कंपन्यांसाठी विद्यार्थ्यांनी मूलभूत विषयांची तयारी दुसऱ्या वर्षांपासून करावी. आयटी प्रॉडक्ट कंपन्यांसाठी विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून अलर्ट असावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shitalkumar ravandale For a job in a product development company