संधी नोकरीच्या : ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’चे क्षेत्र खुणावतेय

डॉ. शीतलकुमार रवंदळे
Thursday, 13 August 2020

इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) म्हणजे एकमेकांशी इंटरनेटद्वारे जोडलेल्या व एकमेकांत माहितीचे आदानप्रदान करणाऱ्या उपकरणांचे जाळे. यातील प्रत्येक उपकरण IP Networkच्या माध्यमातून इंटरनेटशी जोडलेले असते. ही सर्व उपकरणे एकमेकांशी इंटरनेट, वायरलेस वा ब्लू टूथमार्फत जोडली जातात. भारतात पुढील काही वर्षात ‘आयओटी’ क्षेत्रात सुमारे १ ते १.५ कोटी नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता ‘आयओटी इंडिया काँग्रेस’मध्ये व्यक्त करण्यात आली होती. ‘आयओटी’ची खऱ्या अर्थाने सुरुवात १९८२मध्ये झाली.

इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) म्हणजे एकमेकांशी इंटरनेटद्वारे जोडलेल्या व एकमेकांत माहितीचे आदानप्रदान करणाऱ्या उपकरणांचे जाळे. यातील प्रत्येक उपकरण IP Networkच्या माध्यमातून इंटरनेटशी जोडलेले असते. ही सर्व उपकरणे एकमेकांशी इंटरनेट, वायरलेस वा ब्लू टूथमार्फत जोडली जातात. भारतात पुढील काही वर्षात ‘आयओटी’ क्षेत्रात सुमारे १ ते १.५ कोटी नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता ‘आयओटी इंडिया काँग्रेस’मध्ये व्यक्त करण्यात आली होती. ‘आयओटी’ची खऱ्या अर्थाने सुरुवात १९८२मध्ये झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कार्निगी मेलॉन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी एका शीतपेय मशिनच्या वापरात ‘आयओटी’ तंत्रज्ञाचाचा उपयोग केला. ‘आयओटी’ला १९९९ पासून अधिकृतपणे वेगळे तंत्रज्ञान म्हणून ओळख मिळाली. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या (IDC) अहवालानुसार कंपन्यांचा ‘आयओटी’ क्षेत्रात २०२० पर्यंत ७४५ अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे.

Image may contain: text that says "२०१९ वर्षात विविध क्षेत्रातील आयओटी वरील खर्च क्षेत्र खर्चाचे प्रमाण आकडे टक्क्यांत) उत्पादन ૪૪ स्मार्ट होम्स १९ मॅनेजमेंट १९ माल वाहतुकीवरील लक्ष १८"

‘आयओटी’मुळे हेल्थकेअर, उत्पादन, रिटेल, ऊर्जा, शेती इत्यादी क्षेत्रात क्रांतिकारक बदल होत आहेत. गार्टनरच्या अहवालानुसार या क्षेत्रात कमी कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे साधारणपणे ७५ टक्के प्रोजेक्ट्ससाठी अपेक्षित वेळेपेक्षा दुप्पट वेळ लागणार आहे. भारतात ‘आयओटी’ अभियंत्यांचे वार्षिक पगार सुमारे ३,६५७ पासून ते २२,६५१ डॉलरपर्यंत असतात. हेच पगार अमेरिकेत सुमारे ५१,००० ते  १,१०,००० डॉलरपर्यंत असतात. भविष्यात उपलब्ध होणाऱ्या टेक्निकल नोकऱ्यांमध्ये डेटा सायन्सनंतर ‘आयओटी’ हे देखील महत्त्वाचे क्षेत्र आहे.  

‘फॉर्च्युनर बिझनेस इनसाईड’च्या अहवालानुसार २०१८ मध्ये ‘आयओटी’ चे जागतिक मार्केटमधील मूल्य साधारणपणे १९० अब्ज डॉलर होते. त्यात प्रचंड वाढ होऊन वर्ष २०२१मध्ये ते साधारणपणे  १,१०२.६ अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. 

सेन्सर, मोबाईल कनेक्टिव्हिटी व कॉम्पुटिंग पॉवर यात होणाऱ्या वाढीमुळे ‘आयओटी’च्या वापरातदेखील खूप वाढ होणार आहे. कॉम्पुटिंग पॉवरमध्ये गेल्या १५ वर्षात सुमारे १०० पटींनी वाढ झाली आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या अहवालानुसार, २०२५पर्यंत साधारण  ७५.४४ अब्ज उपकरणे एकमेकांना जोडली जाणार असल्यामुळे ‘आयओटी’च्या वापराला फारच महत्त्व प्राप्त होईल. ‘आयओटी’ क्षेत्रातील उलाढाल २०२५ पर्यंत ४ ते ११ ट्रिलियन डॉलर होऊ शकते. 

सध्या भारतीय बाजारपेठेत ‘आयओटी’ची उलाढाल सुमारे १.६ अब्ज डॉलर असून, पुढील पाच वर्षात ती ३.८ अब्जांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.  

आयओटी क्षेत्रातील जॉब रोल्स 

 • IoT Systems Administrator 
 • IoT/Cloud Software Developer
 • IoT Infrastructure Architect  
 • IoT Product Manager
 • IoT Industrial Engineer

‘आयओटी’साठी ओपन सोर्स सॉफ्टवेअर टूल्स  

 • Arduino
 • Zetta
 • DeviceHive
 • Kaa
 • Node-RED
 • Thinger
 • Kinoma

आयओटी सर्टिफिकेशन्स 

 • Cisco Industrial Networking Specialist: Cisco
 • Introduction to the Internet of Things (Graduate Certificate): Stanford School of Engineering 
 • Certified IoT Architect : Arcitura
 • Internet of Things Foundation Series: AWS
 • Certified Azure IoT Developer: Microsoft
 • Internet of Things Foundation Certification (IoTF): Cloud Credential Council 
 • Introduction to Programming the Internet of Things Specialization: UCI Division of Continuing Education 
 • Certified Internet of Things  Practitioner : CertNexus

Certified IoT Professional : IoT-Inc.
आयओटीसाठी ऑनलाइन कोर्सेस 
Coursera

 • Internet of Things: How did we get here?
 • Internet of Things V2: Setting up and Using Cloud Services
 • Internet of Things Capstone V2 : Build a Mobile Surveillance

System

 • Industrial IoT on Google Cloud Platform
 • Introduction to architecting smart IoT devices
 • Programming with cloud IoT platforms

Edx 

 • Introduction to Internet of Things (IOT)
 • CurtinX IoT Sensors and devices
 • WasedaX IoT System Architecture: Design and Evaluation
 • CurtinX IoT Programming and Big Data

Udemy

 • IoT#4 : IoT (Internet of Things) Automation with Raspberry Pi
 • Hands on Internet of Things: Get Started with Raspberry Pi
 • AWS IoT: The Hobbyists Guide to Home Automation
 • Build Internet of Things with ESP8266 & MicroPython

Alison

 • Internet of Things and The Cloud Assessment

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shitalkumar ravandale on Opportunity jobs