इंग्रजी शिका : छंद वाचनाचा

Reading
Reading

‘One child, one teacher, one book, 
one pen can change the world.’ 
जगाला शांततेचा संदेश देणारी, शिक्षणाचे महत्त्व सांगणारी आणि सर्वांत कमी वयात सर्वांत मोठा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या मलालाचे वरील प्रसिद्ध विचार! जगाला बदलवून टाकणाऱ्‍या वरील काही गोष्टींमध्ये पुस्तकाचा समावेश मलालाने केला आहे. वाचनाचे महत्त्व आपण मागील दोन लेखांमधून समजून घेतले. वाचन का करायचे ते आपल्याला समजलेले आहे. वाचनाची गोडी निर्माण होऊन त्याचे रूपांतर सवयीत झाले पाहिजे. एकदा वाचनाची सवय लागली की आपोआप वेळ काढून वाचन होऊ लागते. इंग्लिश भाषेतील पुस्तकांच्या वाचनाची सवय कशी लावून घेता येईल ते आपण पाहू या.

1) Baby steps - ज्या प्रमाणे नुकतेच चालायला शिकलेले बालक लहान लहान पावले टाकत चालण्याचा प्रयत्न करते, त्याप्रमाणे वाचनाची सवय लावून घेण्यासाठी लहान लहान घटकांचे वाचन केले पाहिजे. सुरुवातीलाच अवजड आणि भलेमोठे ग्रंथ वाचायला घेतल्यास पूर्णत्वाचा आनंद मिळण्यास उशीर होईल आणि गोडी सुरू होण्यापूर्वीच वाचन बंद होण्याची शक्यता निर्माण होईल. ग्रंथ वाचावयाचा ठाम निर्धार असल्यास सुरुवातीला अशा मोठ्या ग्रंथातील रोज ५ पाने असे वाचन करत पुढे पुढे पानांची संख्या वाढवता येईल. त्याच प्रमाणे सुरुवातीला रोज १५ मिनिटे वाचन करायचे, असा निर्धार करून पुढेपुढे वाचनाचा वेळ वाढवता येईल. याच प्रकारे लहान लहान कथा संग्रहाने वाचनाची सुरुवात करणे केव्हाही चांगले!

2) Entertainment - एखाद्या तरुणाला जीवशास्त्र या विषयात आवड असल्यास त्याने त्याच विषयाच्या काही रंजक गोष्टीचे वाचन सुरू केले पाहिजे. त्याने भौतिकशास्त्रातील पुस्तके वाचावयास घेतल्यास रुची निर्माण होण्याची शक्यता कमी होते. थोडक्यात काय, आपणास ज्या विषयाची गोडी आहे त्या विषयावरील वाचनीय लेखन इंग्लिश भाषेतून वाचावेत.

3) Set a target - आपल्याला यशस्वी करून दाखवायची प्रत्येक गोष्ट आधी लिहून काढावी, असे म्हटले जाते. आपली वाचनाची सवय टिकवून ठेवण्यासाठी एखादे साध्य होईल असे उद्दिष्ट ठरवले पाहिजे. आणि त्यासाठी एखादी Deadline ठरवली पाहिजे. उदा. येत्या २९ फेब्रुवारीपर्यंत मी Wise and Otherwise हे पुस्तक पूर्णपणे वाचणार. (वर baby step या मुद्द्यामध्ये लहान पुस्तकाचा उल्लेख झाला होता, Wise and Otherwise या सारख्या लहानलहान कथासंग्रहापासून सुरुवात करणे योग्य ठरेल.) याप्रमाणे असे ठरवलेले उद्दिष्ट कुठेतरी सहज आणि वरचेवर दिसेल असे लिहून ठेवा. म्हणजे वाचन करण्याची आठवण होत राहील. म्हणतात ना Out of sight is out of mind.

4) पुस्तक भिशी - मित्रमैत्रिणींचा गट करून नियमितपणे भेटून पुस्तकांची देवाण-घेवाण करता येईल आणि विविध विषयांवरील पुस्तके वाचून काढता येतील. त्याचप्रमाणे आपण वाचत असलेले पुस्तक सोबत ठेवल्यास संधी मिळताच सहज वाचन होत राहील. 

5) Say NO to Screen - अति तेथे माती. एखादी गोष्ट चांगली असूनही तिचा अतिरेक झाल्यास तिच्यापासून चांगले परिणाम मिळतीलच अशी खात्री देता येत नाही. स्मार्ट फोनचे उदाहरण घेऊया. या वस्तूमुळे अनेक सुविधा सहज उपलब्ध झाल्या आहेत. पण त्याचा अतिरेकी वापर आपण सारे पाहतच आहोत. मोबाईलमुळे वाचनासारख्या अनेक इतर महत्त्वाच्या बाबी कमी होऊ लागल्या आहेत. यासाठी टीव्ही, मोबाईलसारख्या उपकरणांचा स्क्रीन टाइम कमी करून त्यापैकी काही वेळ वाचनासाठी दिला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com