संधी नोकरीच्या : नोकरी मिळवण्याचा नवा राजमार्ग; कंपन्यांच्या टेक्निकल स्पर्धा

डॉ. शीतलकुमार रवंदळे
Thursday, 25 June 2020

मागील काही वर्षांपर्यंत कंपन्या परंपरागत पद्धतीने महाविद्यालयात जाऊन कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार देत असत. त्याव्यतिरिक्त विविध वेबसाईट्सच्या माध्यमातून तसेच आपल्या कंपनीत आधीच काम करणाऱ्या लोकांच्या संपर्कातून व काही ट्रेनिंग एजन्सीच्या मार्फतदेखील काही प्रमाणात कंपन्या नोकऱ्या देत असत.

मागील काही वर्षांपर्यंत कंपन्या परंपरागत पद्धतीने महाविद्यालयात जाऊन कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार देत असत. त्याव्यतिरिक्त विविध वेबसाईट्सच्या माध्यमातून तसेच आपल्या कंपनीत आधीच काम करणाऱ्या लोकांच्या संपर्कातून व काही ट्रेनिंग एजन्सीच्या मार्फतदेखील काही प्रमाणात कंपन्या नोकऱ्या देत असत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, आता गेल्या काही वर्षांपासून कंपन्यांनी टेक्निकल स्पर्धांमधून रोजगार देण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढविले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयांनी विविध कंपन्यांच्या या स्पर्धा खूपच गंभीरपणे घ्यायला हव्यात, कारण नोकऱ्या मिळविण्यासाठीचा हा नवीन राजमार्गच विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे.

Image may contain: one or more people and text

पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ॲप्टिट्यूड व संवाद कौशल्यालादेखील बऱ्यापैकी महत्त्व असते. मात्र कंपन्यांच्या टेक्निकल स्पर्धांतून होणाऱ्या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या टेक्निकल कौशल्यांना प्रचंड महत्त्व असते. उद्योगजगताची खरी गरज म्हणजे ‘समस्या सोडविणारे पदवीधर’ ही होय. मात्र अनेक विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होत असले तरी त्यांचे ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असणारे टेक्निकल वा प्रॅक्टिकल ज्ञान थोडे कमी पडते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यामुळेच समस्या सोडविणारे विद्यार्थी शोधण्यासाठी व खरेखुरे ज्ञान असणारे पदवीधर आपल्या कंपन्यांत भरती करण्यासाठी कंपन्यांनी आजकाल स्पर्धांतून नोकरभरती करण्याचे प्रमाण बऱ्यापैकी वाढविलेले दिसते.

उद्योगांचे विविध प्रश्‍न हे सर्व विद्यार्थ्यांबरोबर शेअर केले जातात व दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांनी त्यावरील उपाय देणे अपेक्षित असते. लाखो रुपयांच्या बक्षिसांबरोबरच हजारो विद्यार्थ्यांना या माध्यमातून नोकऱ्या मिळत आहेत.

कंपन्यांना होणारे फायदे

 • चाकोरीपलीकडे विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचा ग्राहकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी उपयोग. 
 • काही ठरावीक महाविद्यालयांऐवजी देशाच्या कानाकोपऱ्यांतील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचादेखील उत्तम प्रतिसाद. 
 • कमी खर्चात चांगले विद्यार्थी निवडण्याची संधी. 
 • तरुण वर्गाची विद्यार्थिदशेतच कंपन्यांबरोबर नाळ जोडली जाते. 
 • महाविद्यालये तसेच विद्यार्थ्यांमध्ये ब्रॅँडिंगची संधी.

विद्यार्थ्यांना होणारे फायदे

 • ज्ञानाचा वापर उद्योगांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी
 • देशातील इतर विद्यार्थ्यांचा तुलनात्मक विचार करता आपण स्वतः कुठे आहोत याची जाण. 
 • बक्षिसाची रक्कम, रोजगारही उपलब्ध. 
 • विचारशक्तीला चालना.

महाविद्यालयांना होणारे फायदे

 • प्लेसमेंटची टक्केवारी वाढणार. 
 • कंपनी प्रतिनिधींबरोबर संवादात वाढ. 
 • कंपन्यांच्या गरजा समजून घेऊन त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची तयारी करता येणार. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shitalkumar ravandale on job