जपान आणि संधी : काईझेनमधून कामात सुधारणेचा मंत्र

सुजाता कोळेकर
Thursday, 18 June 2020

बहुतांश जपानी नागरिक काईझेनचा सतत विचार करत असतात. काईझेन म्हणजे आपण करत असलेल्या कामात रोजच्या रोज सुधारणा करत राहणे. त्यामुळे प्रत्येक काम हे आजच्यापेक्षा उद्या चांगले होते, कामाला लागणारा वेळ कमी होतो आणि त्यामुळे उत्पादन क्षमता वाढते, त्याचा वैयक्तिक पातळीबरोबर कंपनीलाही खूप उपयोग होतो. काईझेन या कार्यपद्धतीचा वापर सध्या संपूर्ण जगात होत आहे.

बहुतांश जपानी नागरिक काईझेनचा सतत विचार करत असतात. काईझेन म्हणजे आपण करत असलेल्या कामात रोजच्या रोज सुधारणा करत राहणे. त्यामुळे प्रत्येक काम हे आजच्यापेक्षा उद्या चांगले होते, कामाला लागणारा वेळ कमी होतो आणि त्यामुळे उत्पादन क्षमता वाढते, त्याचा वैयक्तिक पातळीबरोबर कंपनीलाही खूप उपयोग होतो. काईझेन या कार्यपद्धतीचा वापर सध्या संपूर्ण जगात होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काईझेनचा विचार करताना खालील महत्त्वाच्या घटकांचा विचार केला जातो.  
सांघिक काम (टीम वर्क) : जे काम साध्य करायचे आहे, त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सगळ्यांनी विचारपूर्वक आखणी करायची. सगळ्यांचे विचार एकत्र आल्यावर काम सुरळीत होते. 

वैयक्तिक शिस्त - कोणताही बदल घडवायचा असल्यास वैयक्तिक शिस्त खूप महत्त्वाची आहे. शिस्तीचे पालन केल्यास जो बदल ठरवला आहे, तो साधने सोपे जाते.

No photo description available.

काईझेन या कार्यपद्धतीमध्ये सुधारित नीतिमूल्ये, सुधारलेली गुणवत्ता, त्याचबरोबर सगळ्यांच्या सूचना विचारात घेतल्या जातात. काईझेनच्या कार्यपद्धतीमध्ये पाच Sची प्रणाली मांडली आहे. आपल्या यशाची गुरुकिल्ली म्हणजे प्रक्रियांमध्ये लहान पावले उचलणे आणि ती आपल्या टीममधील लोकांच्या दैनंदिन कामाचा भाग करून घेणे. बहुतेक जण मोठ्या बदलासाठी विरोध करतात, मात्र  लहान बदल स्वीकातात. त्यामुळे लहान बदल करून अंतिम लक्ष गाठणे सोपे जाते. जपानमधील प्रत्येक कंपनीसह नागरिकांच्या वैयक्तिक आयुष्यामध्येही काईझेनचे पालन केले जाते.

मासाकी ईमाई यांनी पुस्तक लिहून काईझेन हा शब्द प्रसिद्ध केला. कोणत्याही प्रकारच्या उद्योगाला गुणवत्तेत सुधारणा करायची असल्यास ते काईझेनचा वापर करू शकतात. त्यामुळे काईझेन तज्ज्ञांची मोठी गरज असते. याचे सर्टिफिकेशन उपलब्ध आहे. मुख्यतः अभियांत्रिकी, ऑपरेशन्स, व्यवस्थापन क्षेत्रातल्या लोकांचा फायदा होतो. ज्यांना या क्षेत्रात किंवा जपानी कंपनीबरोबर काम करायचे आहे, त्यांनी सर्टिफिकेशनचा विचार करावा. याच्या मुख्यतः तीन लेव्हल असतात. अंमलबजावणी करायची आहे, त्यांनी तिन्ही लेव्हल पूर्ण कराव्यात व अनुभवही घ्यावा. यात काम करणाऱ्यांना चांगली संधी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sujata kolekar on japan and chance

Tags
टॉपिकस
Topic Tags: