Career Tips: कानमंत्र... : करिअरला देऊ योग्य दिशा

करिअरसाठी आज अनेक पर्याय दिसत असले, तरी अनेक जण गोंधळलेले दिसतात. काही जणांना योग्य वेळी, योग्य दिशा मिळू शकत नाही त्यामुळे त्यांचा मार्ग भरकटताना दिसतो.
Career Tips in Marathi
Career Tips in MarathiSakal
Summary

करिअरसाठी आज अनेक पर्याय दिसत असले, तरी अनेक जण गोंधळलेले दिसतात. काही जणांना योग्य वेळी, योग्य दिशा मिळू शकत नाही त्यामुळे त्यांचा मार्ग भरकटताना दिसतो.

करिअरसाठी आज अनेक पर्याय दिसत असले, तरी अनेक जण गोंधळलेले दिसतात. काही जणांना योग्य वेळी, योग्य दिशा मिळू शकत नाही त्यामुळे त्यांचा मार्ग भरकटताना दिसतो. काही गोष्टी करिअरला पूरक असतात. त्या वेळीच न करण्याचेही तोटे पुढे दिसू शकतात. त्यामुळे काही गोष्टी आपण लक्षात ठेवू.

  • कोणत्याही करिअरमध्ये कम्युनिकेशन स्किल म्हणजे संवादकौशल्य अतिशय महत्त्वाचे असते. ते अधिकाधिक प्रभावी करण्याकरिता प्रयत्न करावे. पूर्ण प्रभाव पडेल अशा पद्धतीने आपले विचार मांडावे. ते मांडताना संकोच वाटतो असे वाटत असेल, तर मित्रांचा एक ग्रुप बनवून वेगवेगळ्या विषयांवर वादविवाद संवाद साधावा. युट्युब, इन्स्टाग्राम यांसारख्या साधनांचाही आवर्जून उपयोग केला पाहिजे.

  • विशिष्ट भाषा येत नसेल तर न घाबरता ती शिकण्याचा प्रयत्न करावा. इंग्रजी येत नसेल, तरी इतर भाषांतही करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

  • जगात शिकण्यासारखे आणि करिअर करण्यासारखे खूप आहे, हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. आवश्‍यकता असते ती केवळ आपल्या मनात त्या विषयांबद्दलची ऊर्मी जागृत करण्याची.

  • अथक परिश्रम आणि उद्दिष्टावर लक्ष्य केंद्रित या दोन बाबींवर फोकस करून पाठलाग केल्यास हमखास यश मिळवता येते. यशाचा कुठलाही शॉर्टकट नाही.

  • प्रत्येक करिअरच्या मार्गावर कौशल्याचे मैलाचे दगड (Milestone) असतात. ते पार केल्याशिवाय करिअर घडत नाही.

  • करिअर, करिअरसाठी आवश्‍यक कौशल्य आत्मसात करत राहा, कमतरता असलेले कौशल्य शोधत राहा. सतत आत्मपरीक्षण करावे. कौशल्यांचा वापर करावा व कमतरता दूर करून ते आत्मसात करण्याचे प्रयत्न करावेत.

  • बारावीनंतर बऱ्याच पदविका संस्था- जसे की डीएड, हॉटेल मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, फायर इंजिनिअरिंग, ड्रेस डिझायनिंगसारखे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याद्वारे नोकरी/व्यवसायाकरिता आवश्‍यक क्रम उपलब्ध आहेत. याद्वारे नोकरी/व्यवसायाकरिता आवश्‍यक कौशल्य निर्माण करणारे प्रशिक्षण दिले जाते.

  • आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी विषयांचा पूर्ण अभ्यास हा सोपा मार्ग आहे. जे करायचे असेल ते पूर्ण मनलावून करावे. आत्मविश्‍वासाने आणि आनंदाने केलेल्या कामात मिळणाऱ्या यशाचे प्रमाण शंभर टक्के असते.

  • ज्ञान आणि कौशल्य यांच्या जोरावर तुम्ही जगात कुठल्याही कोपऱ्यात तगू शकता. कुठल्याही नोकरी किंवा व्यापाराची हीच मागणी असते. तुमचे यातले प्रावीण्य सिद्ध झाले की तुम्हाला नोकरी शोधावी लागणार नाही, नोकरी तुम्हाला शोधात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com