लसीकरण झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास ऑस्ट्रेलिया तयार! | Educational | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास ऑस्ट्रेलिया तयार!
लसीकरण झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास ऑस्ट्रेलिया तयार!

लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास ऑस्ट्रेलिया तयार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ऑस्ट्रेलिया (Australia) सरकार पुढील आठवड्यात कोरोना (Covid-19) प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लादलेले निर्बंध कमी करणार आहे. या अनुषंगाने ऑस्ट्रेलिया सरकार आशा करत आहे, की ज्यांनी त्यांचे लसीकरण (Covid Vaccine) पूर्ण केले आहे ते दोन दशलक्ष परदेशी विद्यार्थी आणि कुशल कामगार शक्‍य तितक्‍या लवकर देशात परत येतील. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनी सांगितले की, 1 डिसेंबरपासून विद्यार्थी, कुशल कामगार आणि कामानिमित्त सुट्टीवर असलेल्या प्रवाशांना सिडनी (Sydney) आणि मेलबर्न (Melbourne) विमानतळांवर उतरण्याची परवानगी दिली जाईल.

हेही वाचा: ST कर्मचाऱ्यांना 150 कोटी वाढीव वेतन! संप मिटवण्यासाठी तीन पर्याय

मॉरिसन म्हणाले, की ऑस्ट्रेलियामध्ये कुशल कामगार आणि विद्यार्थी परतणे हा आमच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याच्या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ऑस्ट्रेलियन लोक काय साध्य करण्यास सक्षम आहेत आणि ते आम्हाला काय मदत करू शकतात, या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, जानेवारी 2022 पर्यंत दोन श्रेणींमध्ये दोन लाख लोक परत येतील अशी सरकारची अपेक्षा आहे. जपान आणि दक्षिण कोरियाच्या लसीकरण केलेल्या नागरिकांना वेगळे न ठेवता परत येण्याची परवानगी दिली जाईल आणि ज्यांच्याकडे मानवतावादी आधारावर व्हिसा आहे त्यांना देखील परत येण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, सर्वसामान्य पर्यटकांना कधी येण्यास परवानगी दिली जाईल, याबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

ज्या प्रवाशांनी त्यांचे लसीकरण पूर्ण केले आहे त्यांना ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्‍टोरियामध्ये जाण्याची परवानगी दिली जाईल, तर कमी लसीकरण झालेल्या देशांच्या काही भागांमधील सीमांवर महामारीविषयक निर्बंध कायम राहतील. त्रासदायक आणि गोंधळात टाकणाऱ्या सुरुवातीनंतर, ऑस्ट्रेलियाच्या लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. 16 आणि त्याहून अधिक वयाच्या 85 टक्‍क्‍यांहून अधिक लोकसंख्येचे आता पूर्णपणे लसीकरण झाले आहे. सोमवारी ऑस्ट्रेलियाने पुढील महिन्यापासून साथीच्या आजाराशी संबंधित कठोर प्रवासी निर्बंध कमी करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे हजारो भारतीय विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात परत जाण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा: 'डब्ल्यूआयटी'च्या 485 विद्यार्थ्यांचे एकाचवेळी प्लेसमेंट!

दरम्यान, ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत स्वागतार्ह वाटचाल असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्‌विट करून सांगितले. त्यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की ऑस्ट्रेलियाच्या मान्यताप्राप्त Covid-19 लसींच्या यादीमध्ये Covaxin समाविष्ट केल्याने भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांचे ऑस्ट्रेलियात परत जाणे सुनिश्‍चित होईल.

loading image
go to top