'राष्ट्रीय रोबोकॉन २०२२' स्पर्धेत अवसरी खुर्द शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय राज्यात प्रथम

'ए बी यू राष्ट्रिय रोबोकॉन २०२२' स्पर्धेत अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय संघाचा राज्यात प्रथम व देशात दुसरा क्रमांक आला आहे.
Robocon
RoboconSakal
Summary

'ए बी यू राष्ट्रिय रोबोकॉन २०२२' स्पर्धेत अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय संघाचा राज्यात प्रथम व देशात दुसरा क्रमांक आला आहे.

मंचर - दूरदर्शन' व 'आय. आय. टी. दिल्ली यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आलेल्या "ए बी यू राष्ट्रिय रोबोकॉन २०२२' स्पर्धेत अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय संघाचा राज्यात प्रथम व देशात दुसरा क्रमांक आला आहे. महाविद्यालयाचा संघ ता.२१ ऑगस्ट २०२२ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेकरीता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्याचा मंचर (ता. आंबेगाव) येथे सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.आर.पानगव्हाणे म्हणाले 'दिल्ली येथील त्यागराज स्टेडियममध्ये दोन दिवसीय स्पर्धा आय. आय. टी. मध्ये झाल्या. देशातील नामांकित ४३ अभियांत्रिकी महाविद्यालय स्पर्धेत शेवटच्या टप्प्यात खेळण्यासाठी पात्र होते. ए.बी.यू रोबोकॉन २०२२ चे आंतरराष्ट्रीय आयोजक यांनी दिलेली थिम ही 'लगोरी ब्रेकिंग व पायलिंग करणे' यावर आधारीत होती. स्पर्धेकरीता नियमानुसार संघाने दोन रोबोट, रोबोट आर १ व रोबोट आर २ बनविले होते. त्यापैकी आर १ रोबोटवर ओम्नी व्हील ड्राईव्ह, बॉल फेकण्याची यंत्रणा , न्यूमॅटिक सिलेंडर, डिस्टन्स सेन्सर इत्यादी. सेन्सर्स व अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सिस्टिमचा तसेच आर २ रोबोटवर लोकोमोशनसाठी मेकॅनम ड्राईव्ह वापरली. डिस्टन्स सेन्सर, लगोरी उचलनेकरिता पुली व रोप ड्राईव्ह इत्यादी यंत्रणांचा उपयोग केला होता. आर १ रोबोटने ३ सेकंदात २५ गुण व आर २ रोबोट ने ४५ सेकंदामध्ये ६५ गुण प्राप्त करत दिलेले कार्य पुर्ण केले.”

संघाचे नेतृत्व सुशांत फलके याने केले. रोबोटचे ऑपरेटर श्रेयश इंगळे, राहुल शिंदे होते. त्यांच्या मदतीला सतीश मुगळे, ओंकार सुरळकर, सोहम भोकरे, जयेश शिंदे, शुभम सिंग, प्राजक्ता खैरमोडे, मंदार डाळिंबे, एकनाथ माळी, साक्षी इंगोले, विशाल मेटकरी, श्रीकांत ठाकरे, श्वेता काटे, यश मावरे, हर्षवर्धन लोखंडे, कुणाल खैरनार, सत्यजित नलवडे, स्वप्नील पारधी, ज्ञानेश्वर शिंदे होते.

'अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'ए बी यू राष्ट्रिय रोबोकॉन २०२२' स्पर्धेच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याचे नाव देशात नेण्याचे काम केले आहे. सर्वच विद्यार्थी सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल.'

- दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com