पदवीच्या परीक्षा ऑनलाईन, उद्यापासून होणार सुरूवात

विद्यापीठ गेट
विद्यापीठ गेट

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Babasaheb Ambedkar Marathwada University) पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. गुरुवारपासून (ता. २९) पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा ऑनलाईन (Online Examination) पद्धतीने सुरु होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले (Vice Chancellor Pramod Yeole) यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च-एप्रिल२०२१ च्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. कोविडच्या (Corona) पार्श्वभुमीवर सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षा या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकावर विद्यार्थ्यांना पेपर देता येणार आहेत. (bamu conduct its graduate degree online exam from tomorrow aurangabad news glp88)

विद्यापीठ गेट
शिवसेनेचे माजी महापौर राजेंद्र जंजाळांविरोधात गुन्हा दाखल

परीक्षा व मूल्यमापन मंडळाची नुकतीच बैठक होऊन (Aurangabad) परीक्षेचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार २९ जुलैपासुन बीए, बीएस्सी व बीकॉम द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा सुरु होणार आहेत. तर १० ऑगस्टपासून प्रथम वर्षाच्या परीक्षा होतील. पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ ऑगस्टपासून घेण्यात येतील. तर अभियांत्रिकी फार्मसी, विधीसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा २० ऑगस्टपासून सुरु होणार आहेत.

विद्यापीठ गेट
कन्नड तालुक्यात घराची भिंत अंगावर पडून दोघांचा मृत्यू

आदेशप्रमाणे नियोजन : कुलगुरु

पदवी व पदव्युत्तर अभ्यासकमाच्या मार्च-एप्रिल मध्ये झालेल्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. निकालही वेळेवर लावण्यात विद्यापीठ प्रशासनाला यश आले. विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे पुढील सत्राचे नियोजन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com