BECIL Recruitment | आयटीआय उत्तीर्णांपासून ते पदवीधरांपर्यंत सर्वांना मिळणार नोकरीची संधी BECIL Recruitment 2023 job for graduates and ITI holder | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BECIL

BECIL Recruitment : आयटीआय उत्तीर्णांपासून ते पदवीधरांपर्यंत सर्वांना मिळणार नोकरीची संधी

मुंबई : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेडने (BECIL) विविध पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरतीद्वारे तंत्रज्ञ, अभियंता यासह एकूण २८४ पदे भरली जातील.

जे उमेदवार या पदांवर भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी hr.bengaluru@becil.com या अधिकृत ईमेल आयडीवर अर्ज भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २७ मार्च २०२३ आहे. (BECIL Recruitment 2023) हेही वाचा - देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

रिक्त जागांचा तपशील

या भरतीतून एकूण २८४ पदे भरली जाणार आहेत.

महत्त्वाची तारीख

ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये भाग घ्यायचा आहे ते २७ मार्च २०२३ पर्यंत अर्ज भरून ईमेलद्वारे पाठवू शकतात.

शैक्षणिक पात्रता

तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तांत्रिक सहाय्यक पदांच्या भरतीसाठी, उमेदवारांना संबंधित विषयात डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

अभियंता पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे BE किंवा B.Tech पदवी असणे आवश्यक आहे आणि कनिष्ठ अधिकारी पदांसाठी उमेदवारांकडे MBA पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे पुरेसा अनुभव देखील असावा.

वय मर्यादा

सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा स्वतंत्रपणे दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना वाचा.

अर्ज कसा करावा ?

१. - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.becil.com ला भेट द्यावी.

२. - दुसऱ्या स्टेपमध्ये वेबसाइटच्या होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा.

३. - आता भरतीशी संबंधित तपशीलांवर क्लिक करा.

४. - क्लिक केल्यानंतर, भरतीची अधिकृत सूचना तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

५. - आता ते तपासा आणि दिलेला फॉर्म भरा.

६. - फॉर्म भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडा.

७. - शेवटी ईमेलद्वारे फॉर्म पाठवा.

टॅग्स :Recruitmentjob