
सी.ए. : सर्वोच्च व्यावसायिक करिअर!
- प्रा. सुभाष शहाणे
चार्टर्ड अकाउंटंटला संपूर्ण व्यावसायिक व कॉर्पोरेट जगतात तसेच समाजात मानाचे सन्मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. सी.ए. हिशोब तपासतो, चुका सांगतो, अचूकतेला महत्त्व देतो, अकाऊंटस बरोबर असल्याचे प्रमाणित करतो व सही करतो.
कंपनी कायदा व आयकर कायद्याने सी.ए.ची नेमणूक व सी.ए. कडून अकाउंट्स (लेखा) तपासणे व सही घेणे अनिवार्य केले आहे, त्यामुळे सी.ए. च्या करिअरला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणून सी.ए.चा पाठ्यक्रम समजावून घेणे आवश्यक आहे.
सी.ए.ची संस्था व वेबसाइट :
इस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया
वेबसाइट : www.icai.org
किमान शैक्षणिक पात्रता :
इयत्ता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधर
दहावी नंतर सी.ए. कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करता येते. परंतु बारावीची ची परिक्षा झाल्यावर सीए फाउंडेशनची परीक्षा द्यावी लागते व उत्तीर्ण व्हावे लागते. किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर थेट इंटरमिजिएटची परीक्षा देऊ शकतो. पदवीधर उमेदवारासाठी सी.ए. फाउंडेशन देण्याची गरज नाही.
सी.ए. फाउंडेशनमध्ये ५० टक्के गुणांसह ही परीक्षा उत्तीर्ण केल्यावर सी.ए. इंटरमिजिएट परीक्षेला प्रवेश मिळतो. सी.ए. इंटरमिजिएट उत्तीर्ण झाल्यावर पुढे ३ वर्षाची आर्टिकलशीप पूर्ण करावी लागते.
बी.कॉम आणि एम.कॉमची परीक्षा ५५ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी थेट इंटरमिजिएट परीक्षेला बसू शकतात. कॉमर्स शाखेच्या व्यतिरिक्त इतर शाखेचे विद्यार्थी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असतील तरच त्यांना थेट सी.ए. इंटरमिजिएट परीक्षेला बसता येते. याप्रमाणेच सीएस/आयसीडब्लूए इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सीए इंटरमिजिएटला बसता येते.
सी.ए. कोर्सचे टप्पे व कालावधी
मुख्यतः ३ टप्पे आहेत.
१) फाउंडेशन परीक्षा
२) इंटरमिजिएट परीक्षा
३) अंतिम परीक्षा
आर्टिकलशीप ः २ वर्षे कालावधी.
कोर्सचे विषय ः
हा व्यावसायिक कोर्स असल्याने विषय व्यवसायाशी संबंधित आहेत. उदा. अकाउंट, ऑडिटिंग, गणित, अर्थशास्त्र, बिझनेस लॉ, कंपनी लॉ, कॉस्टिंग, फायनान्शिअल अकाउंटिंग.
सर्व विषयांचा अभ्यास करून नीट समजावून घेणे आवश्यक आहे.
या परिक्षेत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कमीत कमी वेळेत सोडविता आले पाहिजे.
सीएचा निकाल २ ते ३ टक्के लागतो असा गैरसमज लोकांमध्ये असतो. फाउंडेशनचा निकाल ३० टक्क्यांपर्यंत लागतो. इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल १५ ते २० टक्के लागतो. जुलै २०२३ मध्ये सी. ए. इंटरमिजिएटचा निकाल १०.२४ तसेच सी.ए. फायनलचा निकाल ८.३३ टक्के लागला आहे.
सी. ए. कोर्सची फी :-
संपर्कासाठी संस्थेचा पत्ता ः
इस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया (ICAI)
भारतीय सनदी लेखाकार संस्था ICAI भवन, इंद्रप्रस्थ मार्ग, नवी दिल्ली
वेबसाइट ः www.icai.org
ssp.helpdesk@icai.in
अशा रीतीने सी. ए. करिअर विषयी थोडक्यात माहिती देता येईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी सी. ए. ची वेबसाइट पहावी व या व्यावसायिक व रोजगाराभिमुख करिअरचा अवश्य विचार करावा. सी.ए.चे करिअर उपयुक्त व आकर्षक असले तरी तितकेच कठीण व किचकट आहे.
विद्यार्थ्यांनी सी.ए. करताना भरपूर कष्ट करण्याची तयारी ठेवावी. दररोज ४ ते ५ तासांचा अभ्यास वेळचे नियोजन, अभ्यासाचे विषयानुसार व अभ्यासक्रमानुसार सुयोग्य नियोजन, महत्त्वाचे प्रश्न व मुद्दे शोधून त्याचा अभ्यास, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडविणे, अकाउटिंग. कॉस्टिंग, मॅथस्, कॉर्पोरेट लॉ सारखेच विषय जाणकार शिक्षकांकडून समजावून घ्यावेत, एखाद्या चांगल्या लायब्ररीचे सहकार्य घ्यावे. वाचन-मनन-सराव ही त्रिसूत्री लक्षात घ्यावी.