Business Idea: 10 हजार रुपयांत घरबसल्या करा हा सुपरहिट व्यवसाय; होईल लाखोंचा नफा

तुम्ही कमी खर्चात सिंदूर बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.
Sindoor Making Business
Sindoor Making BusinessSakal

Sindoor Making Business: जर तुम्ही नोकरीला कंटाळले असाल आणि कमी गुंतवणुकीत तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही सिंदूर बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. कारण ज्योतिषशास्त्रात सिंदूराचे स्वतःचे महत्त्व आहे. वर्षानुवर्षे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी भांगेत सिंदूर लावतात. हिंदू धर्मातील सर्व धार्मिक कार्यक्रमात सिंदूर वापरला जातो, शास्त्रानुसार त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. अशा परिस्थितीत तुम्ही कमी खर्चात सिंदूराचा व्यवसाय सुरू करू शकता आणि चांगला नफा मिळवू शकता. हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता.

सिंदूर स्त्रीचा महत्त्वाचा अलंकार मानला गेला आहे. विशेष म्हणजे केवळ भारतातच नाही तर परदेशात राहणाऱ्या महिलाही याचा वापर करत आहेत. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही सिंदूर व्यवसाय कसा सुरू करू शकता. (Business Idea)

Sindoor Making Business
म्युच्युअल फंडात 100 रुपयांसह सुरु करा गुंतवणूक, देईल चांगला परतावा...

नैसर्गिक सिंदूर कसा बनवायचा-

सिंदूर अनेक प्रकारे बनवता येतो, पण आज आम्ही तुम्हाला एका सोप्या पद्धतीबद्दल सांगणार आहोत. असे म्हटले जाते की नैसर्गिक सिंदूराने त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. हा सिंदूर रोज लावल्यास त्वचेला इजा होत नाही.

या गोष्टी आवश्यक असतील-

1 किलो हळद, 40 ग्रॅम तुरटी, 120 ग्रॅम बोरॅक्स (सोडियम टेट्राबोरेट), 20-25 थेंब लिंबाचा रस, 2 चमचे तिळाचे तेल इत्यादी गोष्टी आपल्याला आवश्यक आहे. आपण येथे फक्त एक उदाहरण म्हणून पाहत आहोत, प्रत्यक्षात तुम्हाला किती प्रमाणात सिंदूर बनवायचा आहे, त्यानुसार वरील साहित्य कमी जास्त होऊ शकते.

Sindoor Making Business
'इंडियन ऑइल'मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी

सिंदूर कसा बनवायचा-

सिंदूर बनवण्यासाठी प्रथम लिंबाच्या रसामध्ये तुरटी पावडर आणि बोरॅक्स पावडर मिसळून द्रावण तयार करा. हे मिश्रण तयार झाल्यावर त्यात हळद टाका. हे मिश्रण दोन ते तीन दिवस सावलीत वाळवा - हळद लाल झालेली दिसेल. तुम्हाला दिसेल की तीन दिवसांनी हळदीचा रंग हळूहळू लाल होईल. हळद चांगली सुकल्यावर त्यात चांगले सुकल्यावर त्यात तिळाचे तेल टाका. आता हे कुंकू किंवा सिंदूर कोणत्याही पोर्सिलेन, काचेच्या किंवा लाकडी भांड्यात ठेवा आणि आवश्यक असेल तेव्हा वापरा.

ऑनलाइन विक्री-

सिंदूर बनवल्यानंतर त्याचे पॅकेजिंग करावं लागतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सिंदूर छोट्या प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये भरू शकता किंवा छोट्या डब्यात टाकूनही विकू शकता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com