Canada Recruitment: नोकरीच्या सर्वाधिक संधी कॅनडामध्ये! पगारही तगडा, 'या' क्षेत्रात सुवर्णसंधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Canada Recruitment

Canada Recruitment: नोकरीच्या सर्वाधिक संधी कॅनडामध्ये! पगारही तगडा, 'या' क्षेत्रात सुवर्णसंधी

Job Vacancies: तुम्ही जर की कॅनडामध्ये नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही गुड न्यूजच ठरेल. कारण एक ते दोन नाही तर दहा लाख नोकरीच्या संधी सध्या कॅनडामध्ये तुम्हाला मिळू शकतात. होय, कॅनडामध्ये जवळपास वन मिलीयन जॉब व्हॅकंसिज असून रोजगार दर सर्वाधिक म्हणजेच इतर देशांच्या तुलनेत 5.7 पटीने जास्त आहे.

अलीकडेच कॅनडाने जॉब वॅकंसीबाबतचा एक अहवाल आणि सर्वे रिपोर्ट जारी केल्या होत्या. यामध्ये यंदा नोकरीसाठी 4.7 पटीने वॅकंसिज वाढल्या असून मागल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 42.3 टक्क्यांनी जास्त आहे. अहवालात असेही निदर्शनास आले आहे की सर्व क्षेत्रांमध्ये देऊ केलेल्या सरासरी तासाच्या वेतनात वाढ झाली आहे. 2021 च्या तुलनेत, ऑफर केलेले सरासरी तासाचे वेतन 5.3% वाढले असून ते प्रति तास $24.05 झाले आहे.

हेही वाचा: Government job : यूपीएससीमध्ये उपसंचालक पदावर भरती; या तारखेपर्यंत करा अर्ज

आणखी कोणत्या देशांतील नोकरीच्या रिक्त जागांमध्ये झाली वाढ ?

ओंटारियोमध्ये सर्वाधिक वाढ म्हणजेच 6.6% वाढ झाली असून याठिकाणी एकूण 379,700 नोकऱ्या रिक्त आहेत. नोव्हा स्कॉशियामध्ये देखील नोकऱ्यांमध्ये 6% वाढ झाली आहे. तर ब्रिटिश कोलंबिया, मॅनिटोबा, अल्बर्टा आणि क्युबेकमध्ये नोकरीत 5.6% वाढ झाली आहे. यामध्ये नोकरीच्या रिक्त पदांमध्ये घट दर्शवणारा एकमेव प्रांत न्यू ब्रन्सविक होता. या देशात केवळ पंधरा हजार रिक्त पदे आहेत.

हेही वाचा: Government job : १८ वर्षे पूर्ण असल्यास BARCमध्ये नोकरीची संधी; पगार ५० हजार

कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक रिक्त पदे आहेत?

2021 च्या क्वार्टर रिपोर्टनुसार आरोग्यसेवा आणि सामाजिक साहाय्य क्षेत्रात २९ टक्के रिक्त जागा वाढल्या आहेत. आरोग्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे काही ठिकाणी तर रूग्णसेवा तात्पुरत्या बंदही कराव्या लागल्या आहेत. सर्वात मोठी वाढ नॅचरल आणि अप्लाईड सायन्स व्यवसायांमध्ये होती, 13.3%. तसेच नॅचरल आणि अप्लाईड सायन्समधील टेक व्यवसायत देखील या क्वार्टरमध्ये 9.6% वाढ झाली आहे.

Web Title: Canada Vacancies At All Time High Salaries Also Up Check Biggest Recruiters

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..