Gaming Industry मध्ये करियर करायचंय? 'ही' डिग्री आहे आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gaming Industry

Gaming Industry मध्ये करियर करायचंय? 'ही' डिग्री आहे आवश्यक

Career in Gaming Industry : गेमिंग इंडस्ट्री भारतात मोठ्याप्रमाणात विकसित होत आहे. पब्जी आणि फ्री फायर सारख्या गेम्सने भारतीय तरूणांमध्ये गेमिंगविषयी क्रेझ वाढवली आहे. खरतर भारतीय मुलं सध्या फक्त गेम खेळणं जाणतात. पण जर त्यांना योग्यमार्गदर्शन मिळालं तर ते गेम डेव्हलप करून त्यात करियर पण करू शकतील.

गेम डेव्हलपर कसं बनावं

जर तुम्हाला फक्त गेम डेव्हलपर बनायचं असेल तर १२ वी नंतर कोणतेही लहान डेव्हलपिंग कोर्स करून तुम्ही डेव्हलपर बनू शकतात. पण जर तुम्हाला या क्षेत्रात चांगलं करियर करायचं असेल तर १२ वी नंतर तीन वर्षांचा डिग्री कोर्स करणं गरजेच ठरणार आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर एक वर्षाचा डिप्लोमा तुम्ही करू शकतात.

हेही वाचा: Career Planning : अर्ली करिअर प्लानिंगचे फायदे

गेम डिझायनिंग चे कोर्सेस

या क्षेत्रात ज्यांना करियर करायचं आहे त्यांनी सगळ्या कोर्सेसची माहिती करून घेणं आवश्यक आहे. गेम डिझायनिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतात. तुमच्या आवडिनुसार योग्य कोर्स निवडणं आवश्यक आहे. जाणून घ्या कोर्सेस

हेही वाचा: Travel Career : ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात उत्तम संधी; जाणून घ्या, आवश्यक स्किल्स अन् अभ्यासक्रम

 • मल्टिमीडिया अँड अ‍ॅनिमेशन विथ गेम आर्ट अँड डिझाइन

 • मल्टिमीडिया अँड अ‍ॅनिमेशन

 • ग्राफिक अ‍ॅनिमेशन अँड गेमिंग

 • गेम डेव्हलपिंग

 • डिप्लोमा इन गेमिंग प्रॉडक्शन

हेही वाचा: Career Guide : करिअर निवडण्याआधी या टिप्स करा फॉलो; नाहीतर होईल पश्चाताप

 • अ‍ॅनिमेशन अँड डिजिटल फिल्म मेकिंग

 • मल्टिमीडिया अँड अ‍ॅनिमेशन

 • मीडिया अ‍ॅनिमेशन अँड डिझाइन

 • ग्राफिक अ‍ॅनिमेशन अँड गेमिंग

 • कंप्युटर सायंस अँ गेम डेव्हलपमेंट

 • अ‍ॅनिमेशन, गेम डिझाइन अँड डेव्हलपमेंट

 • डिप्लोमा इन अ‍ॅनिमेशन, गेमिंग, अँड स्पेशल इफेक्ट

 • अ‍ॅडव्हांस्ड डिप्लोमा इन गेम डिझाइन अँड डेव्हलपमेंट अ‍ॅप्लिकेशन

 • अ‍ॅडव्हांस्ड डिप्लोमा इन गेम आर्ट अँड थ्री डी गेम कंटेंट क्रिएशन

भारतले गेम डेव्हलपिंगचे बेस्ट कॉलेजेस

 • एरिना अ‍ॅनिमेशन दिल्ली

 • iPixio अ‍ॅनिमेशन कॉलेज बंगळुरू

 • एशियन अ‍ॅकेडमी फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन नॉयडा

 • भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटी पुणे

 • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन बंगळुरू

 • दिल्ली युनिव्हर्सिटी

 • अ‍ॅकेडमी ऑफ अ‍ॅनिमेशन अँड गेमिंग नॉयडा

 • इंडिया गेम्स मुंबई

 • जंप गेम्स मुंबई

 • इंस्टिस्ट्यूट फॉर इंटेरियर फॅशन अँड अ‍ॅनिमेशन बंगळुरू