कला शाखेतही करिअरच्या अनेक संधी, चांगल्या पगाराची मिळेल नोकरी

Career
Careere sakal

नागपूर : बारावीनंतर कला शाखेत (career opportunities for 12th student) प्रवेश घेतल्यावर कुठेच संधी मिळत नसल्याचे बोलले जाते. मात्र, समाजात वावरताना, त्यातील प्रत्येक अंगाचा विचार हा कला शाखेत शिकविला जात असल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात कला शाखेचे (career in art faculty) मोठे योगदान आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कला शाखा मागे पडली असली तरी, विद्यार्थ्यांना कला शाखेची व्यापक पार्श्वभूमी मिळाली आहे.

Career
कॉमर्समधून करता येणार यशाचे मॅनेजमेंट, वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे सर्वाधिक संधी

विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासून तंत्रज्ञान आणि झटपट नोकरी मिळविण्याच्या अनुषंगाने वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रमांकडे ओढा असतो. मात्र, कला शाखेत असे अनेक अभ्यासक्रम आहेत, ज्यामुळे विद्यार्थी संभाषण कौशल्यात पारंगत होत, बौद्धिक लवचिकता आणून ती विकसित करण्यास मदत करते. विज्ञान आणि वाणिज्य क्षेत्रांप्रमाणे यातही अनेक पर्याय खुले आहेत. विद्यार्थ्याने लक्षात घ्यायला हवं की कला क्षेत्रात खूप संशोधन आणि अभ्यास करावा लागतो. संशोधन, टीचिंग, पत्रकारिता, समाजकार्य, शासन, व्यवस्थापन, टेलिव्हिजन अँड रेडिओ, प्रसारण माध्यम, कॉर्पोरेट आणि तांत्रिक कम्युनिकेशन्स, पब्लिक रिलेशन्स असे अनेक अभ्यासक्रम पदवीधर विद्यार्थी या शाखेत पदव्युत्तर अभ्यास पूर्ण करू शकतात.

असे आहेत पर्याय -

सिव्हिल सर्व्हिस, सरंक्षणसेवा, जर्नालिझम, बीएएलएलबी, बीएफए, बीएसडब्लू, बीपीएड, हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, बीबीए, फॅशन डिझाईन, ग्राफिक डिझाईन, इंटेरियर डिझाईन, एव्हिएशन मॅनेजमेंट, गृहअर्थशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, फिलोसॉफी, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, भूगोल, राज्यशास्त्र, भाषा, अँथ्रोपॉलॉजी असे विविध पर्याय विद्यार्थ्यांकडे आहेत.

येथे मिळेल संधी -

सिव्हिल सर्व्हिस, सरकारी आणि खासगी उद्योगांमध्ये, रोजगार, कामगार आणि संशोधनाशी निगडित संस्थांमध्ये, वित्त आणि गुंतवणूक कंपन्या, बँका, बिझनेस जर्नल्स, वर्तमानपत्र आणि मासिके, मार्केट रिसर्च संस्था अशा ठिकाणी इकॉनॉमिस्ट म्हणून ना नोकऱ्या मिळतात.

Career
'12th sci' च्या विद्यार्थ्यांना संधी, सर्वच क्षेत्रात करीअरला वाव
कला शाखेत अनेक पर्याय आहेत. दुदैवाने त्याकडे विद्यार्थ्यांची नजर जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचा कल कमी असल्याचे दिसून येते. अगदी प्रशासकीय अधिकारी, पत्रकार आणि चांगले अधिवक्ता यापूर्वीही तयार झालेले आहे. कला शाखेत सशक्त व्यक्ती निर्माण करण्याची ताकद आहे.
-डॉ. आर.जी.टाले, प्राचार्य, बॅ. शेषराव वानखेडे कला, वाणिज्य महविद्यालय, खापरखेडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com