सीबीएसई दहावीच्या प्रथम सत्राचा निकाल जाहीर

ssc exam result
ssc exam resultsakal media

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीच्या प्रथम सत्राच्या (ssc first semester) लेखी परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमध्ये पाहता येणार आहे. त्यासाठीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing certificate) हे दुसऱ्या सत्राच्या निकालापूर्वी विद्यार्थ्यांना दिले जाणार नसल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

ssc exam result
पनवेलमधील पहिल्या रुग्णवाहिकेची अखंडित सेवा; १५ वर्षाची तपश्चर्या

सीबीएसईने प्रथम सत्राचा निकाल विद्यार्थ्यांना वैयक्तिरीत्या पाहण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यानी आपल्या शाळांमध्ये तो पाहावा असे आवाहन मंडळाने केले आहे. सोबत या निकालाचे कोणतेही प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले जाणार नाही. मात्र निकालाची माहिती पाहता येणार आहे.

सीबीएसईकडून दहावीच्या दुसऱ्या सत्राच्या निकालानंतर त्याचे मुल्यमापन पद्धतीने दोन्ही सत्रांचे गुण एकत्र करून त्याचा एकत्रितपणे निकालपत्र आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रथम सत्राची परीक्षा ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com