esakal | CBSE ने 9 वी ते 12 वीच्या अभ्यासक्रमात केला मोठा बदल
sakal

बोलून बातमी शोधा

cbse reduce syllybs

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)ने  9वी ते 12 वीच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. सध्या कोरोनामुळे शैक्षणिक वर्षातील काही काळ वाया गेला आहे. या परिस्थितीमध्ये अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे.

CBSE ने 9 वी ते 12 वीच्या अभ्यासक्रमात केला मोठा बदल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)ने  9वी ते 12 वीच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. सध्या कोरोनामुळे शैक्षणिक वर्षातील काही काळ वाया गेला आहे. या परिस्थितीमध्ये अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. अभ्यासक्रम 30 टक्के कमी करण्यात आल्याची माहिती बोर्डाच्यावतीने देण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याची माहिती दिली. शिक्षणातील झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आणि विद्यार्थ्यावरील दबाव कमी करण्यासाठी सीबीएसईने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये अभ्यासक्रमात बदल केला आहे.

मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं की, भारतास जगात सध्याची परिस्थिती पाहता सीबीएसईच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्याचा आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांवर असलेला ताण करमी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. अभ्यासक्रमातील मुख्य बाबी तशाच ठेवत 30 टक्क्यांपर्यंत तो कमी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. 

हे वाचा - इम्प्रूव्ह युअरसेल्फ : भीतीच्या भावनेच्या मुळाशी

गेल्या महिन्यात दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी कोरोनामुळे झालेलं विद्यार्थ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी अभ्यासक्रम कमी करण्याचा सल्ला दिला होता. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिटींगवेळी अभ्यासक्रम 30 ते 50 टक्के कमी करण्याबाबत चर्चा केली होती. 

नुकतंच सीआयएससीई बोर्डाने 2020-21 च्या शैक्षणिक वर्षासाठी आयसीएसई आणि आयएससी बोर्डाच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन केल्यानंतर शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासही नीट होऊ शकत नाही. यामुळेच बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन क्लासेस घेतले जात असले तरी त्यातून म्हणावा तितका अभ्यास होऊ शकत नाही. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी असा निर्णय घेणं गरजेचं आहे. 

हे वाचा - बारावीच्या विद्यार्थ्यांनो, टेन्शन घेऊ नका! 'असा' करा अभ्यास

बोर्डाने म्हटलं की, कोरोनाने शालेय शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. लॉकाऊनमुळे शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यासाठीच सीआयएससीई बोर्डाने नववी ते 12 वीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्य़ण घेतला. नव्या अभ्यासक्रमाची माहिती cisce.org वर देण्यात आली आहे.